आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊ - येथील मोहनलालगंज परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. सूत्रांनुसार, आरोपी तरुण चार्जर मागण्याच्या बहाण्याने घरात शिरला आणि तरुणीला एकटी पाहून तिच्यावर रेप केला. दुसरीकडे, मंगळवारी आईवडील परतल्यावर पीडितेने त्यांना सर्व घटना सांगितली. यानंतर कुटुंबीयांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याचे म्हटले.
घरात एकटीच होती मुलगी...
- पीडिता म्हणाली की, सोमवारी आईवडिलांनी तिला आजीकडे सोडून ते नातेवाइकाकडे गेले होते. संध्याकाळी आजीही शेतात काही कामानिमित्त शेतात गेली होती.
- यादरम्यान शेजारी राहणारा तरुण अनुज चार्जर मागण्याच्या बहाण्याने घरात शिरला. जेव्हा याचा विरोध केला तेव्हा त्याने माझे तोंड दाबले आणि मागच्या खोलीत घेऊन गेला.
- यानंतर माझ्या तोंडावर कापडाचा बोळा कोंबला आणि माझे सर्व कपडे फाडून बलात्कार केला. मुलगी बेशुद्ध झाल्यावर आरोपी तिला सोडून पळून गेला.
- मंगळवारी सकाळी आई-वडील परतल्यावर पीडितेने त्यांना ढसाढसा रडत सर्व घटना सांगितली. यानंतर कुटुंबीयांनी 100 नंबरवर पोलिसांना याची माहिती दिली.
- घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पीडितेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात पोहोचले.
- मोहनलालगंजचे सीओ राजकुमार शुक्ला यांचे म्हणाले की, "गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला मेडिकलसाठी पाठवले आहे. आरोपी तरुणाचा शोध सुरू असून लवकरच त्याला बेड्या ठोकण्यात येतील."
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिक्स व घटनेचे आणखी फोटोज आणि व्हिडिओ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.