आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलवर दुध विकत होता हा व्यक्ती, असा बनला अब्जोधीश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईडीने सोमवारी मोठी कार्यवाही करत पर्ल ग्रुपचा मालक निर्मल सिहं भंगू याची 427 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. - Divya Marathi
ईडीने सोमवारी मोठी कार्यवाही करत पर्ल ग्रुपचा मालक निर्मल सिहं भंगू याची 427 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

नवी दिल्ली- ईडीने सोमवारी मोठी कार्यवाही करत पर्ल ग्रुपचा मालक निर्मल सिहं भंगू याची 427 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यात ऑस्ट्रेलियाचे दोन हॉटेल्स आणि अनेक ठिकाणच्या जमिनींचा समावेश आहे.  भंगूवर ही संपत्ती स्किम्समधून जमा केल्याचा आरोप आहे. भंगूने पाच कोटींहून अधिक लोकांना अशा स्किम्समध्ये फसवून हजारो कोटी जमा करून  विदेशात गुंतवणूक केली. या प्रकरणी सीबीआयने यापूर्वीही निर्मल सिंहला अटक केली आहे. यापूर्वी जवळपास एक हाजार कोटी रूपायांची संपत्ती जप्त कऱण्यात आली आहे. तसेच 100 पेक्ष अधिक बँक खाते सील करण्यात आले आहे.


कोन आहे निर्मल सिंह भंगू...?
- पर्ल्स ग्रुपचा मालक निर्मल सिहं भंगू पंजाबच्या बनलाळा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तारूण्यात निर्मल आपल्या भावासोबत सायकलवर दुध विकण्याचे काम करत होता असे सांगण्यात येत आहे. या दरम्यान त्याने पॉलिटिकल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्यूएशन केले.
- यानंतर नोकरीच्या शोधात तो 70 च्या दशकात कोलकाता येथे आला. यात त्याने प्रसिद्ध इनवेस्टमेंट कंपनी पियरलेसमध्य काही वर्ष काम केले. त्यानंतर इन्वेस्टर्सकडून कोट्यावधी उकळणाऱ्या हरियाणाची कंपनी गोल्डन फॉरेस्टमध्ये काही वर्ष काम केले. ही कंपनी बंद झाल्यानतंर निर्मल सिहं बेरोजगार झाला.
- याच कंपनीत काम केल्यानंतर त्याने 1980च्या दशकात पर्ल्स गोल्डन फॉरेस्ट नावाची कंपनी स्थापन केली. ही कंपनी सागाच्या झाडांवर गुंतवणूक करून काही वर्षानंतर चांगला मोबदला परत करण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवत होती.  1996 पर्यंत त्याने या कंपनीतून कोट्यावधींची रक्कम जमा केली होती. या दरम्या इनकम टॅक्स आणि इतर चौकशांमुळे ही कंपनी बंद करावी लागली.

 

असे उभे केले विदेशात एम्पायर...
यानतंतर त्यान पंजाबच्या बनरनाळा येथून एक नवी PACL पर्ल्स एग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी सुरू केली. ही एक चेन सिस्टम कंपनी होती. या कंपनीने दाखवलेल्या मोबदल्याच्या आमिषाला बळी पडून जवळपास पाच कोटींहून अधिक लोकांनी या कंपनीत गुंतवणूक केली.
- या अंतर्गत लोकांकडून प्रत्येक महिन्यात साधारन रक्कम जमा करण्यात येत होती. या स्कीममध्ये जवळापास पाच कोटींहून अधिक लोकांनी छोट्या-छोट्या गुंतवणूकी केल्या. यातून निर्मलने विदेशात पर्ल्स ग्रुपचे एंम्पायर उभे केले.
- ही कोट्यावधींची रक्कम भंगूने वेग-वेगळ्या व्यावसायात गुंतवली.
- जेव्हा ठरल्या वेळेत गुंतवणूकदार गुंतवलेला पैसे परत घेण्यास गेला तेव्हा निर्मल ते पैसे परत करू शकला नाही. त्यामुल लोकांनी कंपनीविदोधात तक्रार दाखल केली. सध्या आरोपी सीबीआय़च्या ताब्यात आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...