आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबदायूं (यूपी)- येथे मोहरीच्या शेतात गर्भवती विवाहिता ज्या अवस्थेत आढळली, ते पाहून सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली. 4 नराधमांनी गर्भवतीला दोरखंडाने बांधले आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केला.
असे आहे प्रकरण...
> ही घटना उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यातील आहे. उझानीच्या कछला वस्तीत एका गर्भवती महिलेवर गँगरेपची घटना झाली. गर्भवती महिला जनावरांना चारा दिल्यानंतर शौचासाठी गेली, पण खूप वेळापर्यंत परत आली नाही म्हणून तिचा शोध घेण्यात आला.
> जनावरांच्या गोठ्याजवळच शेतात नग्नावस्थेत ती बेशुद्ध पडलेली आढळली. पती आणि सासरे म्हणाले, 3 ते 4 नराधमांनी तरुणांवर बलात्कार केला. गंभीर अवस्थेत तिला आधी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, येथून तिला जिल्हा महिला रुग्णालय आणि नंतर बरेलीच्या जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. पोलिस कारवाईच्या गोंधळात महिलेवर नीट उपचार होऊ शकले नाहीत. माहिती मिळताच एसपी सिटी आणि सीओंनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली.
शौचासाठी शेतात गेली महिला, नराधमांनी केले अत्याचार
> घटना शुक्रवारी पहाटे 5 वाजेची आहे. 32 वर्षीय महिला जनावरांच्या गोठ्यात चारा टाकण्यासाठी गेली होती. नंतर ती पती आणि सासऱ्यांना सांगून शेतात शौचासाठी गेली. खूप वेळपर्यंत घरी परतली नाही म्हणून सासू तिचा शोध घ्यायला निघाली.
> सासूने सुनेला शेतात विवस्त्र बेशुद्धावस्थेत पडलेली पाहिले. सुनेच्या तोंडात बोळा कोंबलेला होता, दोरखंडाने हातपाय बांधलेले होते. कुटुंबातील इतर लोकही ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. कुटुंबातील महिलांनी तिला चादरीने झाकून उचलून आणले.
> घरच्यांनी अॅम्ब्युलन्सला बोलावले आणि तिला सरकारी रुग्णालयात नेले, परंतु तिला शुद्ध आली नाही. डॉ. आर. के. गंगवार म्हणाले की, पाशवी अत्याचारामुळे गर्भवती महिलेची प्रकृती चिंताजनक झाली आहे. तिला जिल्हा महिला रुग्णालयात रेफर करण्यात आले.
> पीडित महिलेचे सासरे म्हणाले की, मी तेथे गेलो तेव्हा शेतातून 3-4 जण पळून जाताना दिसले. दाट धुके असल्याने आम्हाला ते ओळखू आले नाहीत. सून शुद्धीत आल्यावरच याबाबत काही कळू शकेल. यानंतरच पोलिस कारवाई करतील.
पोलिसांनी केली तपासणी
> पोलिस अधिकारी भूषण वर्मा आणि राजीव कुमार शर्मा यांनीही घटनास्थळी फॉरेन्सिक युनिटसह तपासणी केली. फोरेंसिक टीमने घटनास्थळी पडलेले विवाहितेचे कपडे ताब्यात घेतले आहेत. रुग्णालयात महिलेची वैद्यकीय चाचणी आणि प्राथमिक उपचारासाठी पोलिसांपासून ते रुग्णालयाचे स्टाफने बराच वेळ टाळाटाळ केली. नंतर संध्याकाळी 4 वाजता तिला बरेलीच्या रुग्णालयात रेफर केले आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या हृदयद्रावक घटनेची इन्फोग्राफिक माहिती...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.