आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढा भीषण अपघात की 150 मीटरपर्यंत 8 वेळा उलटली कार, खिडकीच्या बाहेर पडून चाकाखाली चिरडले प्रवासी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातग्रस्त कारखाली फसलेला मृतदेह. वरच्या बाजूला बबीता (संजयची भावजयी आणि पुष्पेंद्रची पत्नी) खालच्या फोटोत नर्गिस (संजयची गर्भवती पत्नी). - Divya Marathi
अपघातग्रस्त कारखाली फसलेला मृतदेह. वरच्या बाजूला बबीता (संजयची भावजयी आणि पुष्पेंद्रची पत्नी) खालच्या फोटोत नर्गिस (संजयची गर्भवती पत्नी).

बयाना/भरतपूर- राजस्थानच्या बयाना-भरतपूर मेगा हायवेवर निर्माण गावाजवळ रविवारी सकाळी टायर फुटून झायलो कार उलटली. 90 च्या स्पीडमध्ये गाडी 150 मीटरपर्यंत 8 वेळा पलटी खात गेली. यात 6 जणांचा मृत्यू झाला. एका महिलेसहित 4 जण जखमी झाले. गाडीत 12 प्रवासी होते. ते भरतपूरच्या आरबीएम रुग्णालयात अॅडमिट असलेल्या संजय जाटव यांना भेटायला जात होते. मृतांमध्ये संजयची गर्भवती पत्नी, भावजयी, मेहुणी, मेहुणा, मामे सासरे आणि मित्र राजकपूर यांचा समावेश आहे. 14 वर्षीय भाचा कोमात आहे. अपघात एवढा भीषण होता की, गाडी पलटी खात असताना आतील लोक खिडक्यांतून निघून बाहेर पडत होते आणि चाकाखाली येत होते.

 

- जखमींनी सांगितले की,  गाडीला त्यांचाच नातेवाइक भरधाव वेगाने चालवत होता. त्याला तसे करायला मनाई केली, तरीही तो म्हणाला, चिंता करू नका, तेवढ्यात हा अपघात झाला. अपघातानंतर ड्रायव्हर नंदूची काहीही माहिती मिळालेली नाही.

- त्याचे सासरे भगवान सिंह जावयाला शोधण्यासाठी मामाची गाडी घेऊन सकाळी 10 वाजता बयानासाठी रवाना झाले. 
- बयानातून जावयाच्या नातेवाइकांना सोबत घेण्यात आले. निर्माण गावाजवळ गाडीचे टायर फुटले होते. यामुळे गाडी तब्बल 150 मीटरपर्यंत 8 वेळा पलटी खात गेली.
- यात संजयची गर्भवती पत्नी नर्गिस (25), भावजयी बबीता पुष्पेंद्र जाटव (28), मेहुणी जूली पप्पूराम जाट (20), मेहुणा मंजित (30) आणि मामे सासरे रामफल धनफूल जाटव (47) यांचा जागेवरच मृत्यू झाला. 
- संजयचे मित्र राजकपूर (26) यांना भरतपुरला रेफर करण्यात आले. परंतु त्यांनीही आरबीएम रुग्णालयात दम तोडला. संजयचा भाचा सहवाग (14) कोमात आहे.
- त्यांचा मेहुणा शैलेंद्र आणि साहिल पप्पूराम जाटव यांना बयानाच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून साहिलला भरतपूरला रेफर करण्यात आले. सासू विमला (45) या गंभीर आणि सासरे पप्पूराम यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

 

#राजकपूर बसने जात होते, पण नातेवाइकांनी गाडीत बोलावले...
- बयानाचे रहिवासी राजकपूर देवीसिंह जाटव खासगी शाळेत शिक्षक आहेत. ते संजयचे चांगले मित्र आहेत आणि घरात एकुलते कमावणारे होते.
- आईने सकाळीच त्यांना जाण्याआधी आज मकरसंक्रांती असली्याने कुठेही जाण्यासाठी मनाई केली होती, पण सोमवारी शाळेत ड्यूटी आहे असे म्हणून त्यांनी रविवारीच जाण्याचा हट्ट धरला. पावणे 10 वाजता खासगी बसने भरतपूरला जाण्यासाठी बसले होते, परंतु अचानक संजयच्या कुटुंबीयांनीच फोन करून त्यांना आपल्यासोबत गाडीत बसवले आणि सोबत नेले. 

बातम्या आणखी आहेत...