आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक! पेन्शन बंद होऊ नये म्हणून मुलाने आईचा मृतदेह चक्क 5 महिने ठेवला घरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी- आईची पेन्शन मिळवण्यासाठी 5 महिने तिचा मृतदेह मुलाने घरातच दडवून ठेवल्याचे प्रकरण नुकतेच वाराणसीमध्ये उघडकीस आले. पासबुकातील नोंदींनुसार अमरावती देवी (70) हिला दरमहा 18 हजार 310 रुपये निवृत्तिवेतन मिळत होते. तिचा मृतदेह 5 महिने घरातच कसा दडवून ठेवला याची माहिती शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मिळेल,     असे पोलिसांनी सांगितले.

 

अमरावती देवी तिची मुले रविप्रकाश, देवप्रकाश व योगेश्वर सोबत राहत होती. तिचे पती दयाशंकर अबकारी विभागात अधीक्षक  होते. त्यांना 5 मुले व एक मुलगी आहे. 2 मुले जानेवारी महिन्यात आईपासून विभक्त राहू लागली होती. शेजाऱ्यांना रविप्रकाश यांच्या घरातून दुर्गंधी बाहेर येत असल्याचे जाणवले. त्यांनी पोलिसांना ही माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घराचा दरवाजा तोडला. तेव्हा खोलीत एका बेडवर सापळाच दिसला. आईचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह रविप्रकाशने एका खोलीत दडवून ठेवला, असे शेजाऱ्यांनी सांगितले. तो आईच्या खात्यावर जमा होत असलेली पेन्शन स्वत: उचलत होता.

 

मृत महिलेच्या मुलीने सांगितले, माझ्या वडिलांचे 1998 मध्ये निधन झाले. आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र राहतो. माझा मोठा भाऊ रविप्रकाश काहीच कमावत नाही. त्याहून लहान भाऊ देवप्रकाश व योगेश्वर हे दोघे आणि सर्वात लहान भाऊ ज्योतिप्रकाश अशी त्यांची नावे आहेत. घरखर्च चालवण्यासाठी देवप्रकाश शिकवणी वर्ग घेतात. वडिलांची पेन्शन होती. ती रक्कम रविप्रकाश आणत होते. चारही भावंडांची लग्ने झालेली नाहीत, असे ती म्हणाली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...