आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय नकाशा : 20 राज्यांमध्ये भाजप-एनडीएची सत्ता, काँग्रेस 4 राज्यांपुरती मर्यादीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- 68% लोकसंख्या आणि 59% अर्थव्यवस्था असलेल्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता. 

- कर्नाटक निवडणुकांच्या निकालामुळे आगामी लोकसभा निवडणुकांपर्यंत राज्यसबेच्या जागांवर काहीही परिणाम होणार नाही. 


नवी दिल्ली - भाजप किंवा त्यांच्या आघाडीची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये 2014 नंतर वाढच होत आहे. मे 2014 मध्ये जेव्हा मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती तेव्हा भाजप किंवा एनडीएची केवळ 8 राज्यांत सत्ता होती. सध्या भाजप आणि एनडीएची 20 राज्यांत सत्ता आहे. तर काँग्रेस कर्नाटक वगळता केवळ पुद्दुचेरी, पंजाब आणि मिझोरमपुरती उरली आहे. दिल्लीसह इतर 7 राज्यांमध्ये इतरल पक्षांची सत्ता आहे. 


मोदी पंतप्रधान बनल्यानंतर 21 राज्यांत निवडणुका झाल्या, भाजपने 14 राज्यांत सत्ता स्थापन केली 
2014 : महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू-काश्मिर
2015 : दिल्ली, बिहार
2016 : आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू 
2017 : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा, गुजरात, हिमाचल
2018 : त्रिपुरा, नगालंड, मेघालय

या 14 राज्यांत भाजप किंवा एनडीएची सत्ता : महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू-काश्मिर, आसम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा, गुजरात, हिमाचल, त्रिपुरा, नगालंड, मेघालय. 
- बिहारमध्ये एनडीएचा सहकारी पक्ष असलेल्या जेडीयूची सत्ता आहे. पण भाजपचा येथे पराभव झाला होता. हा मोठा पराभव होता. दीड वर्षांनी त्यांनी जेडीयूबरोबर आघाडी झाली आणि ते सत्तेत आले. 
- 68% लोकसंख्या आणि 59% अर्थव्यवस्था असलेल्या राज्यांत भाजपची सत्ता आहे. 


कर्नाटक वगळता सध्या 20 राज्यांत भाजपची आघाडी, 3 ठिकाणी कांग्रेस, 7 ठिकाणी इतर पक्षांची सत्ता 

राज्य पक्ष किंवा आघाडी
1. हिमाचल भाजप
2. उत्तराखंड भाजप
3. हरियाणा भाजप
4. गुजरात भाजप
5. राजस्थान भाजप
6. मध्य प्रदेश भाजप
7. छत्तीसगड भाजप
8. झारखंड भाजप
9. अासाम भाजप
10. गोवा भाजप
11. मणिपूर भाजप
12. अरुणाचल भाजप
13. उत्तर प्रदेश भाजप
14. त्रिपुरा भाजप
15. जम्मू-काश्मिर एनडीए
16. महाराष्ट्र एनडीए
17. बिहार एनडीए
18. सिक्किम एनडीए
19. नगालंड एनडीए
20. मेघालय एनडीए
या 3 राज्यांत काँग्रेस
21. पंजाब काँग्रेस
22. मिझोरम काँग्रेस
23 पुद्दुचेरी (केंद्रशासित) काँग्रेस
येथे इतर राज्यांची सत्ता
24. केरळ डावे
25. ओडिशा बीजेडी
26. तमिलनाडू एआयएडीएमके
27. पश्चिम बंगाल टीएमसी
28. तेलंगणा टीआरएस
29. आंध्रप्रदेश टीडीपी
30. दिल्ली (केंद्र शासित) आप
31. कर्नाटक -
 

 

2014 मध्ये 14 राज्यांत काँग्रेस आणि 8 राज्यांत भाजप किंवा एनडीएची सत्ता होती 
या 14 राज्यांत काँग्रेसची सत्ता होती : हिमाचल, हरियाणा, उत्तराखंड, झारखंड, केरल, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, अरुणाचल, मेघालय, मणिपूर, मिजोरम, पुद्दुचेरी 
8 राज्यांत भाजपा किंवा एनडीए : गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, नगालंड आणि छत्तीसगड, पंजाब (अकाली दल-भाजप), गोवा, सिक्किम 
8 इतर : जम्मू-काश्मिर (एनसी), तमिळनाडू (एआयएएमडीके), पश्चिम बंगाल (टीएमसी), ओडिशा (बीजेडी), उत्तर प्रदेश (सपा), बिहार (जेडीयू), दिल्ली (आप), त्रिपुरा (सीपीएम)
नोट: टीआरएसची सत्ता असलेल्या तेलंगणाची स्थापना 2014 मध्ये झाली. 

 

या  4 राज्यांत यंदा निवडणूक 
1) मिझोरम : 1 लोकसभा मतदारसंघ 
2) राजस्थान : 25 लोकसभा मतदारसंघ 
3) छत्तीसगड : 11 लोकसभा मतदारसंघ 
4) मध्य प्रदेश : 27 लोकसभा मतदारसंघ 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...