आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या आमदाराचा मोबाइल चोरीस, अश्लील व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर ठाण्यात घेतली धाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामानुजमगंज-  छत्तीसगडमधील  रामानुजमगंज येथील काँग्रेस आमदार बृहस्पतीसिंह यांच्या मोबाइलवरून मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. या प्रकाराची सकाळी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून आमदारांना कल्पना दिली. त्यानंतर आमदारांनी सकाळीच पोलिस अधीक्षकांकडे तोंडी तक्रार दिली व रामानुजमगंज पोलिस ठाण्यात मोबाइल हरवल्याची तक्रार नोंदवली.

 

तक्रारीत आमदारांनी म्हटले, 16 जुलै रोजी ते पाल भागातील करेवाशिला  सरपंचाच्या घरी एका शोक कार्यक्रमात गेले होते. तेथून परतताना कंचननगर रस्त्यावर काही लोकांना भेटण्यास थांबले. यादरम्यान त्यांचा मोबाइल वाटेत कोठे तरी हरवला अथवा पडला.

बातम्या आणखी आहेत...