आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकतेच लग्न झालेल्या तरुणीचा पॉर्न साइटवर टाकला अश्लील VIDEO, आरोपीने केली \'ही\' डिमांड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपौल (बिहार) - पोलिसांच्या बेपर्वाईमुळे एका महिलेचे घर उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. तिचे नुकतेच लग्न झाले आहे. सूत्रांनुसार, महिलेचा अश्लील व्हिडिओ एका मुलाने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. एवढेच नाही, व्हिडिओला आरोपीने पॉर्न साइटवरही टाकले आहे. यानंतर नवविवाहिताचे सासरचे तिच्या माहेरच्यांवर तिला परत घेऊन जाण्यासाठी दबाव टाकत आहेत. व्हिडिओ 31 डिसेंबर रोजीच व्हायरल करण्यात आला. ज्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ती येथे एका पोलिस स्टेशनमध्येच कार्यरत आहे.

 

तरुणीच्या वडिलांनी 11 डिसेंबरला दाखल केली होती एफआयआर
तरुणीच्या वडिलांनी 11 डिसेंबर 2017 रोजीच मो. जमीर हाशमी आणि त्याचे वडील मो. सलाउद्दीन यांच्याविरुद्ध  FIR दाखल केली होती. आरोप आहे की, जर वेळीच तक्रारीच्या आधारे राघोपूर पोलिसांनी कारवाई केली असती, तर आरोपीने असे करण्याची हिंमत केली नसती. पीडिता म्हणाली की, जमीर सारखा तिला आणि तिच्या नातेवाइकांना फोन करून फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. याशिवाय त्याने तरुणीच्या वडिलांना धमकी दिली होती की, लग्न न मोडल्यास तो त्यांच्या मुलालाही जिवे मारीन. दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जमीरची मोबाइलची दुकान आहे आणि त्याने फसवून तरुणीचे काही प्रायव्हेट फोटोज काढले होते, जे तो व्हायरल करण्याची धमकी देत आहे.

 

जमीर आधी विवाहित, पत्नीला दिलेला आहे तलाक
जमीरने 08 डिसेंबर नंतर फेसबुकवर लगातार अनेक पोस्ट केल्या आहेत. सूत्रांनुसार, जमीरचे यापूर्वीच लग्न झालेले आहे. परंतु त्याची पत्नी आणि मुले त्याच्यापासून वेगळे राहतात. जमीरचा दावा आहे की, त्याने आपल्या पत्नीला खासगी कारणांमुळे तलाक दिला आहे. जमीरविरुद्ध त्याच्या पत्नीकडून किसनपूर पोलिसांत तक्रारीची नोंद असल्याचेही तपासात समोर आले आहे. 

 

वॉरंट केले जारी, आरोपी झाला फरार
पोलिस अधिकारी सरोज कुमार म्हणाल्या की, याप्रकरणी वॉरंटही बजावण्यात आले आहे. आरोपी सध्या फरार आहे. त्याच्या अटकेसाठी छापेमारी केली जात आहे. दुसरीकडे, सुपौलचे एसपी मृत्युंजय चौधरी म्हणाले की, व्हिडिओ वायरल होण्याचे हे प्रकरण खूप गंभीर आहे. आणि पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्यानेच घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास करून योग्य ती कारवाई निश्चितच केली जाईल. बेजबाबदारपणाबद्दल संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाईल.  

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संपूर्ण घटना इन्फोग्राफिकमधून...

बातम्या आणखी आहेत...