आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी लंकेश Murder Case: दाक्षिणात्य अभिनेते प्रकाशराज यांच्याही हत्येचा रचला होता कट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु- कन्नड पत्रकार आणि लेखिका गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी चौकशी करणार्‍या विशेष तपास पथकाने (एसआयटी) धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणजे, लंकेश यांच्या मारेकर्‍यांनी दाक्षिणात्य अभिनेते प्रकाशराज यांच्याही हत्येचा कट रचला होता. एसआयटीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

 

दरम्यान, प्रकाशराज गेल्या काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली होती. तेव्हापासून ते मारेकर्‍यांच्या न‍िशाण्यावर आहेत.

 

काय आहे एसआयटीच्या अहवालात...?

एसआयटीच्या अहवालानुसार, प्रकाश राज मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व हिंदुत्ववादी संघटनांवर सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा प्रकाशराज यांनाही संपविण्याचा कट होता.

 

दरम्यान, गेल्यावर्षी पाच सप्टेंबरला गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.    

 

काय म्हणाले प्रकाशराज?

आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत प्रकाशराज यांनी पुन्हा एकदा सरकार सडकून टीका केली आहे. अशा प्रकारच्या धमक्यांना मी काही घाबरत नाही. उलट या धमक्यांमुळे माझा  आवाज आणखी प्रबळ होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवरून दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...