आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाराणसी - यूपीच्या वाराणसीमध्ये एक असे प्रकरण समोर आले आहे, येथे आंध्र प्रदेशचे वृद्ध दांपत्य 7 वर्षांपासून मृत्यूची प्रतीक्षा करत आहे. लाजिरवाणी बाब अशी की, त्यांची चारही मुले सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ते वाराणसीच्या मुमुक्ष भवनातील लहानशा खोलीत दिवस-दिवस महादेवाची आराधना करत आहेत. DivyaMarathi.Com ने दांपत्याशी संपर्क साधला.
असे आहे पूर्ण प्रकरण...
- आंध्र प्रदेशात वेल्लूर कॉलेजातून संस्कृतच्या डीन पदावरून निवृत्त आचार्य डॉ. अवतार शर्मा म्हणाले, ''4 वर्षांपासून काशीत आम्ही दोघेही पती-पत्नी किरायाने राहत आहोत. 3 वर्षापूर्वी मुमुक्ष भवनात मोक्ष प्राप्तिसाठी आणि काशी पुण्यासाठी आलो. पत्नी वैंकटरमन अम्मा तेलुगू साहित्याच्या माध्यमिक कॉलेजमध्ये शिक्षिका होत्या.''
- ''मुले तीन-तीन महिन्यांनी आम्हाला भेटायला येतात. आम्ही दोघांनी उभी हयात मुलांचे संगोपन आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी खर्ची घातली. आम्ही लहानपणापासूनच ऐकले होते, येथे मृत्यू मिळाल्यावर मोक्ष मिळतो. यामुळे काशीला आलो. आमच्या मुलांनी आम्हाला घराबाहेर काढलेले नाही, तर आम्ही आमच्या मर्जीने येथे राहायला आलो आहोत.''
पंचमुखी शिवलिंग बनवले..
- येथे 11 फुटी पंचमुखी शिवलिंग आहे. याच्या एका परिक्रमेतून 3 कोटी 25 लाख पंचाक्षरी मंत्र 'ॐ नमः शिवाय' आणि 12 द्वादश ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे फळ प्राप्त होते. अवतार शर्मांनी हे बनवून घेतले आहे.
- या शिवलिंगाची स्थापना 16 मार्च 2016 रोजी झाली होती. डॉ. शर्मा म्हणाले, ''माझा संकल्प 7 कोटी पंचाक्षरी मंत्रांचा आहे, जे भक्तांकडून लिहून घेतले जात आहे.''
- ''हे मंत्र भारतासहित विदेशात राहणारे भक्त यांनी दिलेल्या कागदावर लिहितात. मग बाय पोस्ट किंवा काशीला येऊन जमा करतात. या मंदिराच्या बांधकामासाठी एकूण 28 दिवस लागले होते. वेल्लूरातून 12 कारागिरांना बोलावण्यात आले होते. हे बांधण्यासाठी एकूण साडे 8 लाख रुपयांचा खर्च झाला होता.''
4 मुले आहेत सॉफ्टवेयर इंजिनिअर
- ''4 मुले आहेत, सर्व सॉफ्टवेयर इंजिनिअर आहेत. दोन अमेरिकेत, एक बंगळुरूत आणि एक हैदराबादेत जॉब करतो. एक मुलगा अॅमेझॉनमध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे.''
- ''13 वर्षे वयात वेंकटरमन अम्मा यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची जबाबदारी मी घेतली आणि लग्न केले. अम्माचा 2006 मध्ये मोठा अपघात झाला, मणक्याची हाडे मोडली. 3 वेळा मोठी शस्त्रक्रिया झाली आणि आतून प्लेट लावलेल्या आहेत. डॉक्टरांनी कुठेही फिरण्यासाठी मनाई केली होती, पण 2011 मध्ये काशीत आलो. अजूनपर्यंत बाबा विश्वनाथानेच स्वस्थ ठेवले आहे.''
यामुळे येथे आहे मृत्यूची इच्छा...
- डॉ. अवतार शर्मा म्हणाले, 2011 मध्ये एका सकाळी मी विश्वनाथ मंदिरात दर्शन करण्यासाठी गेलो होतो. अचानक मला बाबा विश्वनाथांनी काही मिनिटांसाठी छातीशी धरल्याची अनुभूती झाली. त्या वेळी मला महाकठीण दशमहाविद्याचा मंत्र पूर्णपणे आठवू लागला. यानंतर आम्ही दोघांनी याच काशीनगरीत मृत्यूची वाट पाहण्याचे ठरवले.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.