Home | National | Other State | IPL: Kings XI defeat Bangalore; Sunrisers Hyderabad beat Vijay by 5 runs in the match

IPL: काेहलीच्या बंगळुरूचा पराभव; सनरायझर्स हैदराबादचा विजय, अटीतटीच्या लढतीत ५ धावांनी केली मात

वृत्तसंस्था | Update - May 09, 2018, 01:11 AM IST

सामनावीर कर्णधार विलियम्सन (५६) अाणि शाकीब अल हसनच्या (२/३६) शानदार कामगिरीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने साेमवारी

 • IPL: Kings XI defeat Bangalore; Sunrisers Hyderabad beat Vijay by 5 runs in the match

  हैदराबाद - सामनावीर कर्णधार विलियम्सन (५६) अाणि शाकीब अल हसनच्या (२/३६) शानदार कामगिरीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने साेमवारी ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. हैदराबादने घरच्या मैदानावर विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. यजमान हैदराबादने ५ धावांनी सामना जिंकला. यासह विलियम्सनच्या हैदराबाद संघाने लीगमध्ये अाठवा विजय संपादन केला. यामुळे हैदराबाद संघाला १६ गुणांच्या अाधारे अाता गुणतालिकेतील अापले अव्वल स्थान अधिक मजबूत करता अाले. दुसरीकडे काेहलीच्या बंगळुरू टीमचा यंदाच्या लीगमधील हा सातवा पराभव ठरला.


  विलियम्सनच्या अर्धशतकाच्या अाधारे यजमान हैदराबादने अापल्या घरच्या मैदानावर बंगळुरूसमाेर विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात बंगळुरूला ६ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या १४१ धावांपर्यंत मजल मारता अाली. बंगळुरू संघाच्या विजयासाठी कर्णधार विराट काेहलीने एकाकी झंुज देताना सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांना फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवता अाले नाही. त्यामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला. पार्थिव पटेलने २० अाणि मनदीप सिंगने नाबाद २१ धावांचे याेगदान दिले. मात्र, त्यांना टीमचा पराभव टाळता अाला नाही.

  सामनावीर विलियम्सनचे पाचवे अर्धशतक
  हैदराबाद संघाचा सामनावीर विलियम्सनने अापली झंझावाती खेळी कायम ठेवताना बंगळुरूविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ३९ चेंडूंचा सामना करताना ५ चाैकार अाणि २ षटकारांसह ५६ धावा काढल्या. त्याचे यंदाच्या लीगमधील हे पाचवे अर्धशतक ठरले. तसेच बंगळुरूविरुद्ध त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले अाहे.

  पुढील स्लाईडवर पहा सामन्याचे धावफलक ....

 • IPL: Kings XI defeat Bangalore; Sunrisers Hyderabad beat Vijay by 5 runs in the match
 • IPL: Kings XI defeat Bangalore; Sunrisers Hyderabad beat Vijay by 5 runs in the match

Trending