Home | National | Other State | IPL Match KKR and KXIP in Indore

IPL : काेलकात्याने रचला विक्रमी स्काेअर; पंजाबने 31 धावांनी गमावला सामना

वृत्तसंस्था | Update - May 13, 2018, 06:46 AM IST

कोलकात्याने फक्त एक बदल करत टॉम कुरेनच्या ऐवजी जेवन सियरल्सचा टीममध्ये समावेश केला.

 • IPL Match KKR and KXIP in Indore

  इंदूर - सामनावीर सुनील नरेन (७५) अाणि कार्तिकच्या (५०) फटकेबाजीच्या बळावर काेलकाता नाइट रायडर्सने यंदाच्या अायपीएलमध्ये सर्वाधिक २४५ धावांचा डाेंगर रचून विक्रमाची नाेंद केली. यासह काेलकाता संघाने शनिवारी शानदार विजय संपादन केला. काेलकात्याने अश्विनच्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर ३१ धावांनी मात केली. काेलकाता संघाचा लीगमधील सहावा विजय ठरला. दुसरीकडे पंजाबचा हा सलग दुसरा अाणि लीगमधील पाचवा पराभव अाहे. या पराभवामुळे पंजाबच्या प्ले अाॅफमधील प्रवेशात अडचणी निर्माण झाल्या अाहेत. पंजाब १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी अाहे.


  काेलकात्याने ६ गड्यांच्या माेबदल्यात पंजाबसमाेर विजयासाठी २४६ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात पंजाब संघाला ८ गडी गमावून २१४ धावांपर्यंत मजल मारता अाली.

  सामनावीर सुनील नरेन

  काेलकात्याचा सामनावीर सुनील नरेनने पंजाबविरुद्ध अष्टपैलू कामगिरी केली. त्याने फलंदाजीत ७५ धावांची खेळी केली. गाेलंदाजी करताना एक बळी घेतला.

  लाेकेशची झुंज व्यर्थ : पंजाबच्या विजयासाठी युवा सलामीवीर फलंदाज लाेकेश राहुलने (६६) दिलेली एकाकी झुंज व्यर्थ ठरली. अांद्रे रसेल (३/४१), प्रसिध (२/३१) यांनी धारदार गाेलंदाजी करताना पंजाबला राेखले.

 • IPL Match KKR and KXIP in Indore
 • IPL Match KKR and KXIP in Indore
 • IPL Match KKR and KXIP in Indore
 • IPL Match KKR and KXIP in Indore
 • IPL Match KKR and KXIP in Indore
 • IPL Match KKR and KXIP in Indore
 • IPL Match KKR and KXIP in Indore
 • IPL Match KKR and KXIP in Indore
 • IPL Match KKR and KXIP in Indore

Trending