आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jagtar Singh Sentenced To Life Imprisonment In The Killing Of Punjab Chief Minister Beant Singh

पंजाबचे मुख्यमंत्री बियांतसिंग यांच्या हत्येप्रकरणी जगतारसिंगला जन्मठेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- चंदिगडमधील न्यायालयाने पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांतसिंग यांच्या हत्येप्रकरणी शनिवारी जगतारसिंग तारा यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शुक्रवारी तारा यास न्यायालयाने दोषी ठरवले होते. ३१ ऑगस्ट १९९५ रोजी मुख्यमंत्री बियांतसिंग पंजाब व हरियाणा सचिवालयाजवळ  झालेल्या बॉम्बस्फोटात ठार झाले होते. या अपघातात अन्य १७ जणांचाही मृत्यू झाला होता. पंजाब पोलिस दलातील शिपाई दिलावरसिंग याने मानवी बॉम्ब होऊन हा स्फोट घडवला होता. 


तारा याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न व कट रचणे या आरोपांवरून खटले सुरू होते. बियांतसिंग यांच्या हत्येबद्दल मला खेद वाटत नाही, असे  आरोपी जगतारसिंग तारा याने न्यायालयास सांगितले होते. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली होती, तर न्यायालयाने नंतर सहा जणांना फरार घोषित केले होते.

बातम्या आणखी आहेत...