आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K मधून AFSPA हटवण्यास ही योग्य वेळ नाही, आपली आर्मी सर्वात शिस्तप्रिय - महबूबा मुफ्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी राज्यातील वादग्रस्त आर्म्ड फोर्स अॅक्ट (स्पेशल पॉवर) AFSPA हटवण्यास नकार दिला आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील सध्याच्या स्थितीचा हवाला दिला. त्या म्हणाल्या की आपले लष्कर हे संपूर्ण जगातील सर्वात शिस्तप्रिय सैनिकांचे आहे. 

 

'लष्करामुळे आपण येथे आहोत'
- सीपीएम नेते मोहम्मद यूसुफ तरिगामी यांनी AFSPA हटवण्याचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा मुख्यमंत्री मुफ्ती यांनी त्यांना प्रतिप्रश्न केला. त्या म्हणाल्या, 'अशा परिस्थितीत AFSPA हटवला जाऊ शकतो?  हे योग्य आहे?'
- महबूबा पुढे म्हणाल्या, 'इंडियन आर्मी हे जगातील सर्वात शिस्तप्रिय लष्कर आहे. ते संरक्षण आणि तणाव कमी करण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळेच आपण येथे आहोत, त्यांनी मोठे बलिदान दिले आहे.'

बातम्या आणखी आहेत...