आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई मेन्स परीक्षेचा कटऑफ यंदा 75 ते 80 दरम्यान शक्य!160 वर गुण,तर चांगली एनआयटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा- जेईई मेन्सचा कट ऑफ यंदा ७५ ते ८० गुणांचा राहू शकतो, तर १६० हून अधिक गुण मिळवले तर विद्यार्थ्यांना दर्जेदार एनआयटीमध्ये प्रवेश मिळेल. १५ हजारपर्यंतची रँक मिळवणाऱ्यांनाही सहज टॉप एनआयटी मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी २.२४ लाख विद्यार्थ्यांना अॅडव्हान्सची संधी मिळेल. त्यामुळे तुलनेने मेरिट थोडे कमी राहील. 


२०१७ मध्ये जनरलचा कटऑफ ८१, ओबीसींचा ४९, एससींचा ३२ व एसटीचा २७ गुण असा होता. या वर्षी पेपरमध्ये १० प्रश्न असे होते, जे जेईई मेन्सच्या अभ्यासक्रमात तर आहेत, मात्र अॅडव्हान्सच्या अभ्यासक्रमात नाहीत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी केवळ अॅडव्हान्सच्या अभ्यासक्रमानुसार तयारी केली त्यांना फटका बसू शकतो. रविवारी विविध केंद्रांवर जेईई मेन्सची ऑफलाइन परीक्षा झाली. १५-१६ रोजी ऑनलाइन परीक्षा होईल. दरम्यान, अॅडव्हान्समध्ये पात्रता मिळवणाऱ्यांची संख्या ४ हजाराने वाढवल्यामुळे कट ऑफवर परिणाम होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.


तज्ज्ञांनुसार, केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये थेअरी अभ्यासक्रम अधिक होता. त्यामुळे त्याची काठिण्य पातळी अधिक होती. मॅथ्समध्ये ५-६ प्रश्न दीर्घोत्तरी होते. मात्र, अगदीच कठीण नव्हते. फिजिक्सचा पेपर मात्र तुलनेने सोपा होता. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या कट ऑफचा विचार करता यंदा तो ७५ ते ८० गुणांचा राहील, अशी शक्यता आहे.  

बातम्या आणखी आहेत...