दागिने व्यापाऱ्याने 14 बँकांना 824 कोटी रुपयांनी फसवले; कनिष्क गोल्ड विरुद्ध गुन्हा
नवी दिल्ली/चेन्नई- नीरव मोदीनंतर ज्वेलरी व्यवसायाशी संबंधित आणखी एका कंपनीने १४ सार्वजनिक बँकांची ८२४.१५ कोटींची फसवणूक केली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवर सीबीआयने चेन्नईतील कनिष्क गोल्ड प्रा. लि. विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी कंपनीचे मालक व प्रवर्तक भूपेशकुमार जैन आणि त्यांची पत्नी नीता जैन यांच्या घर आणि कार्यालयांवर
छापे मारण्यात आले. दोघेही मॉरिशसमध्ये असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.