आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक निवडणूक : प्रचारासाठी राहुल गांधी 19, अमित शहा 27 मंदिरांत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - राहुल गांधी यांनी कर्नाटकात प्रचार मोहिमेला  १० फेब्रुवारीपासून सुरुवात केली होती. आतापर्यंत त्यांनी ८५ दिवसांत राज्याचा ८ व्यांदा निवडणूक दौरा केला. या दौऱ्यात ते सुमारे १८ दिवस राज्यात मुक्कामी राहिले. राहुल राज्यातील काँग्रेसच्या जन आशीर्वाद यात्रेत सातत्याने सहभागी झाले आहेत. विजयासाठी राहुल यांनी ८५ दिवसांत १९ मंदिर-मठ गाठले. कर्नाटकात सुमारे ८५ टक्के जिल्ह्यांत जाहीर सभा, रोड-शोच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तीन हजार किलो मीटरहून जास्त प्रवास केला.

 

राहुल यांचे दर्शन

राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये ८५ दिवसांत २७ मंदिराचे दर्शन घेतले होते. परिणामी काँग्रेसला गुजरातेत मठांचा प्रभाव असलेल्या ४७ जागांवर विजय मिळाला होता.

* सिद्धेश्वर मठ कोपल, हुलीगेमा मंदिर, कोपल.

* कानाकाचाला लक्ष्मी नरसिंह मंदिर, कोपल. 

* सारानाबश्वेश्वरा मंदिर, कलबुर्गी.

* वीरभद्रेश्वर मंदिर, बेळगाव.

* सावादाती, यालामा मंदिर, बेळगाव.

* मुरुगाहा, मठ, धारवाड.

* श्रृंगेरी शारदा देवी मंदिर.

* कुदरेली गोकरानाथेश्वर मंदिर, मंगळुरू.

* कुरुदुमाली गणेश मंदिर कोलार.

* सिद्धगंगा मठ, तुमाकुरू.

*  चुंचानगिरी मठ, बंगळुरू.

* चामुंडेश्वरी मंदिर, म्हैसूर.

* सुत्तरु मठ, म्हैसूर.

* मंजुनाथेश्वर मंदिर.

 

शहा यांचे मंदिर दर्शन

* बसवेश्वरा मंदिर, कलबुर्गी.

* गुरू नानक बीदर.

* बुद्ध विहार.

* वीरभद्रेश्वर मंदिर.

* मारीकांबा.

* सिद्धारुद्धा मठ, हुबळी.

* मोरुसाविरा मठ.

* नारायण स्वामी मंदिर.

* सुब्रमण्यम मंदिर.

* श्री कृष्ण मठ उडूपी.

* मुरुघाराजेंद्र मठ

* ताराबालु मठ.

* कलमठ, शिमोघा.

* सिद्धगंगा मठ.

* नंजुनदेश्वरा मंदिर.

* सुत्तरु मठ, म्हैसूर.

* सच्चिदानंदेश्वरा आश्रम.

* शृंगेरी पीठि.

*  बलेहोनुरु मठ.

* दुर्गमविका मंदिर.

* अश्जकया मंदिर.

* सिद्धेश्वर मठ.

* शिवयोगी मंदिर,बदामी.

*  चेलुवानारायण मंदिर.

* अंजनी स्वामी मंदिर. मादरा मठ.

 

 

 १२० ठिकाणी संपर्क

अमित शहा यांनी राज्यातील आपल्या प्रचार दौऱ्यास २० फेब्रुवारीला सुरूवात केली होती. शनिवारी त्यांनी राज्यात ५ रोड-शो केले. राज्यात त्यांनी २० दिवसांच्या मुक्कामात १० दौरे केले. त्यांनी गेल्या ७५ दिवसांत २७ मंदिर व मठांत पूजा-अर्चना केली. त्या माध्यमातून १२० मतदारसंघात जनसंपर्काचा प्रयत्न केला.

 

 

बातम्या आणखी आहेत...