आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कश्मीर-उत्तराखंड-हिमाचलमध्‍ये जोरदार हिमवृष्‍टी, जम्‍मू-श्रीनगर महामार्ग तिस-या दिवशीही बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोंगराळ भागांमध्‍ये होणा-या हिमवृष्‍टीमुळे मैदानी परिसरांमधील तापमान घसरले आहे. - Divya Marathi
डोंगराळ भागांमध्‍ये होणा-या हिमवृष्‍टीमुळे मैदानी परिसरांमधील तापमान घसरले आहे.
देहरादून/श्रीनगर/चंडीगड- श्रीनगरमध्‍ये मंगळवारी या हंगामातील पहिली हिमवृष्‍टी झाली. राज्‍यातील राजौरी येथेही बुधवारी हिमवृष्‍टी झाली आहे. हिमवृष्‍टीमुळे काश्‍मीर खो-याला देशाशी जोडणारा जम्‍मू-श्रीगनर हायवे तिस-या दिवशीही बंद होता. दुसरीकडे हिमाचल प्रदेशमधील शिमला, मनाली, नारकंडा, सोलन आणि उत्‍तराखंडमधील केदारनाथ येथे 2 फुट तर बद्रीनाथला 1 फुट हिमवृष्‍टी झाली आहे. उत्‍तरेकडील या हिमवृष्‍टीमुळे त्‍याखालील मैदानी परिसरांमध्‍ये कडाक्‍याची थंडी पडली आहे.

 

लाहौल-स्‍पीतीमध्‍ये पारा 4.9
- हवामान खात्‍याने दिलेल्‍या माहितीनूसार, हिमवृष्‍टीमुळे हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्‍पीती येथे बुधवारी पारा 4.9 अंशांपर्यंत घसरला होता.
- याव्‍यतिरिक्‍त राज्‍यात कल्‍पामध्‍ये 1, डलहौजीमध्‍ये 0.0, मनालीत 0 आणि शिमलामध्‍ये 3.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

 

रोहतांगमध्‍ये 50 सेमी हिमवृष्‍टी
- मंगळवारी मनाली, नारकंडा, संगला येथे हंगामातील पहिली हिमवृष्‍टी झाली.
-  याव्‍यतिरिक्‍त सिरमौर, रोहतांग, साच, चांसेल आणि कुंझजवळी जोरदार हिमवृष्‍टी झाली आहे.
- रोहतांगमध्‍ये 50 सेमीपर्यंत हिमवृष्‍टी झाली आहे.

 

केदारनाथमध्‍ये 2 फुटपेक्षा अधिक हिमवृष्‍टी
- केदारनाथ धाममध्‍ये मंगळवारी दिवसभर हिमवृष्‍टी झाली. येथे 2 फुटाहून अधिक हिमवृष्‍टी झाली. बद्रीनाथ धाममध्‍ये जवळपास 1 फुट हिमवृष्‍टी झाली. यमुनोत्री आणि  गंगोत्री धाममध्‍येही सतत हिमवृष्‍टी सुरु आहे.

 

पंजाब-हरियाणामध्‍ये तापमान घसरले  
- उत्‍तरेतील डोंगराळ भागात होणा-या हिमवृष्‍टीचा परिणाम मैदानी परिसरांमध्‍ये होताना दिसत आहे. पंजाब आणि हरियाणामध्‍ये पारा 10 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेला आहे.
- बुधवारी अमृतसरमध्‍ये किमान तापमान 10.8 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 15.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
- लुधियानामध्‍ये किमान तापमान 12.4 अंश तर पटियालामध्‍ये 13.5 अंश नोंदवले गेले आहे.
-  हरियाणामध्‍येही तापमानात घट झाली असून अंबालात 13.8 तर हिसार करनालमध्‍ये 12.9 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...