आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद जवानच्या पित्याचे मोदींना Challenge, 72 तासांत कारवाई करा अन्यथा आम्ही बदला घेऊ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहीद जवानाच्या पित्याने मोदींना दहशतवाद्याच्या खात्म्याचे चॅलेंज दिले आहे. - Divya Marathi
शहीद जवानाच्या पित्याने मोदींना दहशतवाद्याच्या खात्म्याचे चॅलेंज दिले आहे.

श्रीनगर - ईदसाठी सुटी घेऊन घरी येत असलेल्या मुलाची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर त्याच्या वडीलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दहशतवादाचा खात्मा करण्याचे चॅलेंज दिले आहे. भारतीय जवान रायफलमॅन औरंगजेब ईदच्या दिवशी कुटुंबासोबत राहाणार होता, त्याला त्याच दिवशी सुपुर्द-ए-खाक करण्याची वेळ त्याचे वडील मोहम्मद हनीफ यांच्यावर आली. त्यानंतर ते म्हणाले, नरेंद्र मोदींनी येत्या 72 तासांत दहशतवादाचा खात्मा केला नाही तर आम्ही त्याविरोधात लढण्यासाठी तयार आहोत. शहीद जवान औरंगजेब ईदसाठी घरी निघाले असताना गुरुवारी (14 जून) त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांचा मृतदेह पुलवामामध्ये आढळला होता. 

 

ईदीच्या दिवशी आर्मी जवान औरंगजेबचा दफनविधी 
- ईदच्या सुटीवर घरी निघालेले जवान औरंगजेब यांच्यावर ईदच्याच दिवशी (शनिवार) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मुळ गाव पूंछ येथे सुपुर्द-ए-खाक करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक जमा झाले होते. 

 

काश्मीर नेत्यांनी जनतेला मरण्यासाठी सोडून दिले- मोहम्मद हनीफ 
- शहीद औरंगजेब यांचे वडील मोहम्मद हनीफ म्हणाले, 'भारत सरकारकडे एवढी मोठी ताकद आहे की ते काहीही करु शकतात. प्रत्येक घरात घुसून सर्च ऑपरेशन केले जाते. मात्र 2003 पासून आजपर्यंत काश्मीरचा प्रश्न सोडवला गेला नाही. एवढी मोठी फोर्स आहे, तरीही एवढे मोठे नुकसान होत आहे. काश्मीर हे काही भारतापेक्षा मोठे नाही. आज माझा मुलगा माझ्यासोबत ईद साजरी करणार होता, मात्र त्याचा मृतदेह घरी आला. दहशतवाद्यांनी त्याला मला भेटूही दिले नाही. श्रीनगरमध्ये जेवढे नेते आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे असतील, सर्वांना फक्त आपला मतदारसंघ वाचवायचा आहे. येथील जनतेशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. या नेत्यांना बाजूला करुन वॉर केले पाहिजे. एकतर्फी कारवाई करुन सफाया केला पाहिजे आणि जे बाहेरचे आहेत त्यांना हकलून लावले पाहिजे. नरेंद्र मोदी सरकारला 72 तासांचे वॉर्निंग देतो, नाही तर आम्ही स्वतः लढाईला तयार आहोत.'

 

काश्मीरला आम्ही असेच जळू देणार नाही
- मोहम्मद हनीफ म्हणाले, 'औरंगजेब आमचा मुलगा होता, तो काश्मीरचा बेटा होता. येथे जाती पातीचा प्रश्न नाही. पाकिस्तान काश्मीरमध्ये काय करत आहेत? तो आमचं आणि आमच्या देशाचं नुकसान करत आहे. आम्ही काश्मीरला असं जळताना पाहू शकत नाही. काश्मीरमध्ये पाकिस्तानचा झेंडा नाही तर आपल्या देशाचा तिरंगा फडकला पाहिजे.'
- औरंगजेबचे वडील हनीफ हे भारतीय सैन्यातील निवृत्त सैनिक आहेत. त्यांचा भाऊ देखील सैन्यात आहे. 2014 मध्ये दहशतवाद्यांनी औरंगजेबच्या काकाचे अपहरण करुन त्यांची हत्या केली होती.

 

शेवटच्या स्लाइडवर पाहा, जवानाच्या पित्याचा व्हिडिओ... 

 

हेही वाचा.. 
औरंगजेबच्या हत्येपूर्वी दहशतवाद्यांनी तयार केला Video, एन्काऊंटरबाबत विचारले प्रश्न

 

बातम्या आणखी आहेत...