आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता केरळात महात्मा गांधींच्या पुतळ्याचा चष्मा तोडला, 4 दिवसांत देशात 6 पुतळ्यांची विटंबना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नूर- महापुरुषांच्या पुतळ्यांची तोडफोड अजूनही थांबलेली नाही. गुरुवारी केरळातील कन्नूरजवळील तालिपरम्बातील एका युवकाने महात्मा गांधींच्या पुतळ्याचा चष्मा तोडला व हार काढून टाकला. पुतळ्याच्या जवळच तुटलेली फ्रेम आढळली. दगड मारून पुतळा तोडण्याचा युवकाचा हेतू होता.

 

कुठे कुठे झाल्या पुतळा विटंबनेच्या घटना... 

त्रिपुरा : २ दिवसांत भाजप कार्यकर्त्यांनी लेनिनचे दोन पुतळे पाडले

त्रिपुराच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सोमवारी भाजप कार्यकर्त्यांनी बेलोनियामध्ये ११.५ फूट उंचीचा लेनिनचा पुतळा बुलडोझरने पाडला होता. मंगळवारीही लेनिनच्या एका पुतळ्याची तोडफोड झाली. पहिल्यांदाच भाजपला राज्यात सत्ता मिळाली. बुधवारी माकप कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात भाजपचे ५ कार्यकर्ते जखमी झाले.

 

तामिळनाडू : नेत्याच्या पोस्टनंतर पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड
तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यात मंगळवारी रात्री समाजसुधारक व द्रविड आंदोलनाचे संस्थापक ई. व्ही. रामासामी पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड झाली. ही घटना भाजप नेते राजा यांच्या फेसबुक पोस्टनंतर घडली. पोलिसांनी भाजप व एका माकपशी संबंधिताला अटक केली. कोइम्बतूरमध्ये भाजप कार्यालयावर बाँबने हल्ला झाला.

 

उत्तर प्रदेश : मेरठमध्ये आंबेडकरांचा पुतळा तोडला, तत्काळ नवा बसवला
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यामधील मवाना भागात मंगळवारी रात्री काही समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. परंतु प्रशासनाने त्या जागी तत्काळ नवीन पुतळा बसवला. या घटनेवरून स्थानिक लोकांत बराच वेळ तणाव होता. नागरिकांनी पुतळा बदलण्याची मागणी केली.

 

पश्चिम बंगाल : ७ लेफ्ट विंग संघटनेच्या सदस्यांनी फासले काळे
बुधवारी कोलकात्यातील कालीघाटमध्ये जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला काळे फासले. पोलिसांनी मुखर्जी यांच्या पुतळ्याची नासधूस केल्याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. हे हल्लेखोर लेफ्ट विंग संघटनेशी संबंधित आहेत, असे पोलिसांनी सांगितले. त्यात ६ पुरुष, तर एक महिला आहे.

 

संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ

संसदेच्या बजेट सत्राच्या पहिल्या तीन दिवसांत प्रचंड गोंधळ झाल्याने कामकाज स्थगित ठेवावे लागले. बुधवारी लोकसभा व राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष खासदारांनी पुतळा तोडणे, आंध्र प्रदेशला विशेष दर्जा, नीरव मोदीप्रकरणी प्रचंड गदारोळ घातला.

बातम्या आणखी आहेत...