आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखेडा- शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गांधीजींनी १९१८ मध्ये खेडा सत्याग्रहाचे हत्यार उपसले. या आंदोलनाला २२ मार्चला १०० वर्षे पूर्ण झाली. पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची करमुक्तीची मागणी प्रशासनाने फेटाळली. गांधीजींनी शेतकऱ्यांना सत्याग्रहाचा सल्ला दिला. प्रतिज्ञापत्र भरून घेतले. वचनभंग करण्याऐवजी माझा गळा चिरून टाका, असे आवाहन त्यांनी प्रतिज्ञापत्रात केले होते.मिल मजुरांना हक्क मिळवून देण्यासाठी गांधीजी अहमदाबादेत आले होते. खेडातील शेतकरी संकटात असल्याची माहिती त्यांना मिळाली. २२ मार्चला ते नडियादला पोहोचले. एक चतुर्थांश पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. गांधीजींनी सत्याग्रह करण्याचा सल्ला दिला. याला प्रतिसाद देत वकील वल्लभभाई, इंदूलाल याज्ञिक यांच्यासह अनेक युवा नेते पुढे आले. सरकारने दंडुकेशाही केली तरी शेतकऱ्यांपैकी कोणी हिंसा करणार नाही, असे आश्वासन शेतकऱ्यांकडून त्यांनी घेतले.
प्रतिज्ञापत्र भरण्यासाठी गांधीजींनी वल्लभभाई पटेलांकडे जबाबदारी दिली होती. यात म्हटले होते, ‘गावचे पीक एक चतुर्थांशपेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत कर वसुली थांबवण्याची विनंती करण्यात आली होती. पण तरीही वसुली सुरूच आहे. त्यामुळे आम्ही या वर्षी पूर्ण कर किंवा थकबाकीची रक्कम भरणार नाही. पण कारवाईसाठी सरकारला अडवणारही नाही.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.