आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमारस्वामी म्हणाले, 30-30 महिन्यांसाठी मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही डील नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी जनता दलाचे (से.) नेते एच.डी.कुमारस्वामी हे साेमवारी दिल्लीत संयुक्त पुराेगामी अाघाडीच्या नेत्या साेनिया गांधी व कांॅग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार अाहेेत. या वेळी कांॅग्रेस व जेडीएसदरम्यान मंत्रिपदांच्या वाटपासह सरकार गठीत करण्याच्या रूपरेषेवर चर्चा हाेईल. दरम्यान, काँग्रेससाेबत ३०-३० महिन्यांसाठी मुख्यमंत्रिपदाबाबत कुठल्याही फाॅर्म्युल्यावर काेणतीही डील झालेली नाही. याबाबत सुरू असलेल्या चर्चेला अाधार नसल्याचे सांगून काँग्रेस नेत्यांसाेबत झालेल्या बैठकीत जेडीएसकडेच मुख्यमंत्रिपद राहील, हे निश्चित असल्याचेही कुमारस्वामी यांनी रविवारी स्पष्ट केले.


एच.डी.कुमारस्वामी यांनी हेदेखील स्पष्ट केले की, बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या २४ तासांच्या अात अाम्ही बहुमत सिद्ध करू. दुसरीकडे जेडीएसशी केलेली अाघाडी २०१९च्या लाेकसभा निवडणुकीनंतरही कायम राहण्याचे संकेत कांॅग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी अाझाद यांनी दिले. 

बातम्या आणखी आहेत...