आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बकऱ्या विकून शौचालय बांधणाऱ्या कुंवरबाईचे निधन;धमतरी रुग्णालयात अखेरचा श्‍वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- छत्तीसगडमध्ये स्वत:च्या ६ बकऱ्या विकून सुनेसाठी शौचालय बांधणाऱ्या कुंवरबाई (१०६) यांचे शुक्रवारी निधन झाले. गेल्या सोमवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना धमतरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मेंदू व अनेक अवयव निष्क्रिय झाले. त्यानंतर त्यांना रायपूर येथील आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, २०१६ च्या स्वच्छ भारत मोहिमेत कुंवरबाईंचे योगदान पाहता पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी एका जाहीर कार्यक्रमात त्यांचा पदस्पर्श करून कृतज्ञता व्यक्त केली होती. पंतप्रधानांनी त्यांच्या या कार्याचे कौतुकही केले होते. कंुवरबाई यांनी त्यांच्याकडील बकऱ्या विकून २२ हजार रुपये आले होते. त्या खर्चातून गावात पहिले शौचालय बांधले. 


मुख्यमंत्र्यांना भेटण्याची होती इच्छा

उपचारादरम्यान, कुंवरबाईंनी मुख्यमंत्री रमणसिंग यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु बुधवारी मुख्यमंत्री दिल्लीत होते. त्यांनी कुंवरबाईंशी रात्री ९.४५ वाजता व्हिडिओ कॉलिंग करून विचारपूस केली होती. 

बातम्या आणखी आहेत...