आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुपवाडा : घुसखोरीचा प्रयत्न उधळला; पाच अतिरेक्यांचा खात्मा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू-काश्मिरात सीमेवरील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये शनिवारी पहाटे नियंत्रण रेषेजवळ तैनात सुरक्षा दलांनी अतिरेक्यांच्या घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळला. चकमकीत ५ अतिरेक्यांना ठार करण्यात आले. 


शनिवारी पहाटे नियंत्रण रेषेजवळ अतिरेक्यांचा एक समूह पाकव्याप्त काश्मिरातून सीमा आेलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे जवानांनी टिपले. अतिरेक्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले.   मात्र अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही त्याता तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. भीषण चकमकीत ५  अतिरेक्यांना टिपण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...