आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फी साठी नसायचे पैसे, शिपायांच्या क्वार्टरमध्ये राहायचे \'लालू\', वाचा कशामुळे पडले हे नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - 900 कोटींच्या चारा घोटाळ्यातील एका खटल्यात लालुंना सीबीआय कोर्टाने बुधवारी 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील फुलवरिया गांवातील एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या लालूंनी आपल्या स्वतःच्या बळावर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीपर्यंतचा प्रवास केला. 15 वर्षे बिहारवर राज्य करणारे लालू चारा घोटाळ्यात असे काही अडकले की, आज ते तुरुंगात कैद आहेत. 


चला जाणून घेऊयात लालूंचा प्रवास..
- लालू प्रसाद यांचा जन्म 11 जून 1948 ला झाला होता. भावंडांमध्ये सर्वात लहान असलेले लालू लहानपणी सुदृढ होते. त्यामुळेच त्यांचे नाव लालू असे ठेवण्यात आले होते. 
- लालू यांच्याकडे शाळेची फीस द्यायलाही पैसे नव्हते. ते शिक्षकांना पैशाऐवजी दोरी द्यायचे. 
- शालेय शिक्षणानंतर लालुंनी पाटणा विद्यापीठाच्या बीएन कॉलेजमधून राज्यशास्त्रात एमए केले. 
- त्यानंतर त्यांनी एलएलबीची परीक्षा पास केल्यानंतर राजकारणात पाऊल ठेवले. नंतर जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सहभागी झाले. 
- याच आंदोलनात नितीश कुमार, रामविलास पासवान आणि सुशील कुमार मोदी त्यांचे सहकारी होते. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, लालुंच्या जीवनातील  प्रवासाविषयी..

बातम्या आणखी आहेत...