आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात एकट्या झोपलेल्या वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला; हातपाय सापडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांकेर- छत्तीसगडच्या कांकेर  शहरापासून जवळच्या गावात  मंगळवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने एका वृद्ध महिलेवर झडप घालून तिला उचलून नेले. बुधवारी सकाळी एका शेतात तिचे हात व पाय इतकेच अवयव सापडले. त्यावरून ही घटना गावकऱ्यांना समजली. कांकेर शहरापासून ८ किमी अंतरावर खमडोही गाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शन्नो हिचामी (६५) ही वृद्ध महिला घरात झोपलेली होती. तिच्या घरातील इतर लोक दुसऱ्या घरात होते. सकाळी तिची सून तिला उठवण्यासाठी गेली. तेव्हा महिला जागेवर नव्हती. बराच वेळ वाट पाहूनही ती दिसली नसल्याने शन्नोचा शोध सुरू झाला. घरापासून काही अंतरावर तिचे कपडे सापडले. त्यानंतर अर्धा किमी अंतरावर एका मोठ्या दगडामागे महिलेचे अवयव सापडले. शिर व धड बिबट्याने गिळंकृत केले होते. 

बातम्या आणखी आहेत...