आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेळेच्या कागदातून सुचली मोफत वाचनालय कल्पना; छत्तीसगडमधील सर्व जिल्ह्यात समिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपूर- भेळ खाण्याच्या कागदाच्या एका तुकड्याने छत्तीसगडमधील एका तरुणाच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. हा तुकडा म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीच्या पुस्तकाचे एक पान होते. तो वाचल्यानंतर तरुणाने साेशल मीडियावर एक पोस्ट टाकली. त्यात म्हटले होते की, रद्दी फेकून देऊ नका. त्याच रद्दीतील अभ्यासाची पुस्तके गोरगरिबांच्या मुलांना द्या. त्याच्या आवाहनास भरभरून प्रतिसाद मिळाला. आता तो राज्यातील १२ ठिकाणी शाळकरी मुलांना मोफत शिकवत आहे. आता या ग्रुपने २०२६ पर्यंत १०० शाळकरी मुलांना आयएएस करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  


गरीब मुलांना नि:शुल्क पुस्तके देण्याचे आणि त्यांना शिकवणी देण्याचे काम चरामेती ग्रुप करत आहे. साेशल मीडियाच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या या ग्रुपच्या सदस्यांना त्यांच्या पगारातील काही पैसे वाचवून गरीब मुलांवर ही रक्कम खर्च केली जाते. या ग्रुपद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून १२ ठिकाणी वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. तेथे गरिबांना मोफत पुस्तके मिळतात.   फेसबुकवरून देशभरातील ३३ हजार कार्यकर्ते आणि ८५० ग्रुप सदस्यांच्या मदतीने सामाजिक कार्य नेटाने सुरू आहे. ग्रुपचे प्रमुख प्रशांत महातो सांगतात, या कामाची प्रेरणा २०१५ मध्ये मिळाली. तेव्हा दिल्लीत आयएएस स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.  रायपूर येथील एका  दुकानावर त्याच्या हातात असलेला भेळचा कागद स्थापत्य अभियांत्रिकीच्या रामामूर्थन यांच्या पुस्तकाचा होता. या कागदाचे मोल तो जाणून 
होता. येथूनच त्याच्या चरामेती ग्रुपची सुरुवात झाली. प्रशांतने फेसबुकवर पोस्ट टाकली आणि ग्रुप वाढत गेला. प्रशांत महातो स्वत: स्थापत्य अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे.  


१६ राज्यांतून १७ हजार पुस्तके गोळा : प्रशांतने मोहिमेची सुरुवात करताना कार्यकर्त्यांच्या मदतीने १६ राज्यांतून दोन महिन्यांत १७ हजार पुस्तके गोळा केली. या राज्यांत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू,  पंजाब,  दिल्ली, हरियाणा, उत्तरांचल  आणि आसाम अादी राज्यांचा समावेश आहे. 

 

आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रशांतचा सहभाग 
गुजरातेतील अहमदाबाद येथे २०१६ मध्ये झालेल्या ग्लोबल अॅक्शन ऑन पॉव्हर्टी या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणारा प्रशांत सर्वात कमी वयाचा सामाजिक कार्यकर्ता होता. या ग्रुपमध्ये भारतीय सदस्यांशिवाय अमेरिका आणि सिंगापूर येथील सदस्य आहे.  गरीब मुलांना रजई वाटप करण्याच्या योजनेत अमेरिकेतून १०० रजया आल्या होत्या. गरीबांसाठी मोफत अन्नदानाचीही योजना प्रशांत महातो याने राबवली आहे. तो अन्नछत्रेही चालवतो.

बातम्या आणखी आहेत...