आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकच किडनी असलेल्या रुग्णाचे यकृत प्रत्यारोपण; देशातील पहिली अशी शस्त्रक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- छत्तीसगडमधील रायपूर येथील श्री बालाजी रुग्णालयात एक किडनी असलेल्या पोलिसांचे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. अशा प्रकारची देशातील ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचा डॉक्टरांचा दावा आहे. जगातही एक किडनी असलेल्या रुग्णाचे यकृत प्रत्यारोपण करण्यात आल्याची तुरळक उदाहरणे आढळतात. आजवर कोणत्याही सरकारी वा खासगी रुग्णालयात अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. या शस्त्रक्रियेचा खर्च पोलिस खात्याने दिला आहे. 


मोवा येथील बालाजी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर सुदामा वर्मा (४५) या पोलिस कर्मचाऱ्याची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. सुदाम गेल्या सात-आठ वर्षापासून त्याला यकृताचा त्रास होता. रुग्णालयाचे संचालक डाॅ. देवेंद्र नायक म्हणाले, सुदामाचे यकृत नादुरुस्त झाल्याचे समजले तेव्हा त्याला एकच किडनी असल्याची कल्पना नव्हती. सोनोग्राफीत ही बाब समजली तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. कारण एक लाख रुग्णात दोन अथवा तीन अशा प्रकारचे रुग्ण आढळतात. 

बातम्या आणखी आहेत...