आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेलवर अधिभार वाढवून कर्नाटकात कर्जमाफी; राहुल गांधी यांच्या फ्युएल चॅलेंजचा विरोधाभास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी विधानसभेत २०१८-१९ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. ही कर्जमाफी देताना जेडीएस-काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवर अधिभार वाढवला. यामुळे इंधन महागले आहे. कर्जमाफीत प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे २ लाखांपर्यंतचे कर्ज राज्य सरकार माफ करेल. पहिल्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत शेतीसाठी घेतलेली कर्जे ज्यांनी चुकवली नाहीत त्यांना कर्जमाफी देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात जिल्हा सहकारी बँक व राज्य सहकारी समित्यांकडून शेतकऱ्यांनी घेतलेले कृषी ऋण माफ केले जाईल. 


सामान्य माणसावर मात्र इंधन दरवाढीचे संकट
कर्नाटक सरकारने पेट्रोलवरील अधिभार २% वाढवून ३२% केला. डिझेलवरील विक्रीकरात १९ हून २१% वाढ केली. ही दरवाढ किरकोळ असल्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. यामुळे राज्यातील सामान्य माणसावर महागाईचे संकट कायम आहे. वीज दरदेखील २० पैसे प्रति युनिट वाढवण्यात अाला आहे. 


सामान्य माणसावर मात्र इंधन दरवाढीचे संकट 
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींच्या फिटनेस चॅलेंजवरून त्यांना इंधन दर कमी करण्यासाठी 'फ्युएल चॅलेंज' दिले होते. 'इंधन दरवाढ कमी करा, अन्यथा काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर आंदोलन करेल,' असे राहुल यांनी हे चॅलेंज देताना म्हटले होते. कर्नाटक सरकारचा इंधन अधिभार वाढवून कर्जमाफी देण्याचा हा निर्णय नेमका राहुल गांधींच्या भूमिकेशी विसंगत आहे. 

बातम्या आणखी आहेत...