आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Looteri Dulhan Giroh In Pali Rajasthan लुटेरी दुल्हन टोळीचा भंडाफोड

या महिलेने 2 वर्षांत केले 8 जणांशी लग्न, 9व्या वेळी अशी पकडली लुटेरी दुल्हन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाली (राजस्थान) - यूपीच्या गाझियाबादमध्ये पतीने हाकलून लावल्यानंतर 3 मुलांची आई रेखा चौहान मध्यप्रदेशच्या खरगौन जिल्ह्यात बनावट लग्नाच्या बहाण्याने लाखो रुपये लुटणाऱ्या टोळीच्या तावडीत अशी अडकली की तिला 2 वर्षांतच लग्नाच्या नावावर 8 जणांना विकण्यात आले. यापैकी 7 लग्ने पाली जिल्ह्यातील दलालाच्या माध्यमातून लावण्यात आली. आणि ज्यांच्याशी लग्न लावले त्यांच्याकडून टोळीने 5-5 लाख रुपयांहून जास्त उकळले. 

> विशेष बाब अशी की, प्रत्येक लग्नानंतर ती पळून जात होती. 9व्या वेळीही तिला हिंगोला गावातील एका तरुणाला लग्नाच्या नावावर विकण्याची तयारी केली जात होती. परंतु, तरुणीला मागच्या सौद्यामध्ये एक रुपयाही मिळाला नव्हता म्हणून तिने बंडखोरी केली. 

 

असा झाला भंडाफोड... 
> यादरम्यान, पतीने तिचा फोन रेकॉर्डिंगवर घेऊन पूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. आता महिलेचे म्हणणे आहे की, तिला कुठेही जायचे नाही. एसपींच्या आदेशावरून सदर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. रेखाची तिन्ही मुले तिच्या पहिल्या नवऱ्याजवळ आहेत.
> रिपोर्टनुसार, गुडा नारकानचा रहिवासी मूलाराम तुलसाराम सीरवी हा टेवालीमध्ये मजूरी करतो. त्याचे लग्न न झाल्याने तो त्रस्त होता. यादरम्यान, इंद्रवाडाचा रहिवासी गुल्लाराम ऊर्फ गिरधारी दीपाराम सीरवी त्याला भेटला.
> मध्यप्रदेशात आपल्या मेहुण्याची मुलगी रेखाचा फोटो दाखवून त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्या बदल्यात मेहुण्याची आर्थिक परिस्थिती दयनीय असल्याचे सांगून 5 लाख रुपयांची मागणी केली.
> लग्न मध्य प्रदेशातच जाऊन लावण्याचे आश्वासन दिले. तुलसारामने 2 लाख अॅडव्हान्स दिले. यानंतर 18 नोव्हेंबर 2017 ला खरगौनमध्ये राकेश गुजराती नावाच्या वकिलामार्फत नोटरी पब्लिकमध्ये शपथपत्राच्या आधारे लग्न लावले. 
> लग्नात नवरदेवाचे नाव रेखा सीरवी लिहिण्यात आले. तिचे बनावट आधार कार्ड तयार करण्यात आले. उर्वरित 3 लाख लग्नानंतर देण्यात आले. सौद्यामध्ये 1 लाख न दिल्यास तेथे उपस्थित आरोपी गुल्लारामसहित टोळीतील आशा राठौड, दिलीप राठौड, शीतल तसेच राहुल कुमार हे अडून बसल्याने मोठा भाऊ बुधारामला पुण्यात फोन करून लगोलग त्यांच्या बँक खात्यांत पैसे जमा करायला लावले. गुल्लारामने आपला खर्च सांगून 30 हजार रुपये वेगळे घेतले.

 

'8 लग्ने केली, पण एक रुपयाही मिळाला नाही'
> रेखाचा आरोप आहे की, 8 लग्नांमध्ये तिला आतापर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही. एवढेच काय, तिला तिचे कपडेही घेऊन देण्यात आले नाही. या वेळी ती बँकेत पैसे जमा करण्यासाठी अडून बसली. यामुळेच टोळीच्या सांगण्यावरून पळून गेली नाही.

 

पीडितेने सांगितली या 8 तरुणांची नावे, ज्यांच्यासोबत लग्नाच्या नावावर गेली
1.जयपूर-रामपाल, 2. बिलाड़ा-रामलाल, 3. बिलावास-प्रताप, 4. भालेलाव-विमलेश, 5. पुणे-कूपाराम, 6. आग्रा-राहुल कुमार, 7. प्रीतमपुरा-अशोक, 8. गुड़ा नारकान-मूलाराम (आग्राशिवाय सर्व तरुण एकाच समाजातील आहेत)


टोळीचे सदस्य करायचे मारहाण व बलात्कार
> रेखाने आरोप केला आहे की, तिने विरोध केल्यावर टोळीतील शीतल तरुणांना दारू पाजून तिच्यावर बलात्कार व मारहाण करायला लावायची. एकानंतर एक 8 जागी लग्न आणि सतत पळून जाऊन ती त्रस्त झाली होती.
> आता या कुटुंबाचा आधार मिळाला, तर तिला या लोकांना शिक्षा भोगायला लावायची आहे.

 

टोळीच्या इशाऱ्यावरून चीजवस्तू लुटून व्हायची फरार
> रेखाने भास्करला सांगितले की, पतीच्या घरातून निघाल्यावर तिला टोळीतील सदस्य शीतलचा दीर भेटला. शीतल तिला बहाण्याने एमपीला घेऊन गेली. पहिले लग्न जयपूरमध्ये रामपाल सीरवीशी लावले. लग्नानंर टोळीचे मेंबर तिला सर्व चीजवस्तू घेऊन पळून जायला सांगायचे.
> ती टोळीच्या दबावामुळे हे सर्व करत होती. प्रत्येक वेळी लग्नाचे आमिष दाखवून तिची विक्री करण्यात आली. नोव्हेंबर 2017 मध्ये गुड़ा नारकानच्या मुलारामशी तिचे 8वे लग्न झाले.
> येथूनही टोळीने तिचा सौदा हिंगोला गावात केला. परंतु मुलारामने फोन रेकॉर्ड करून तिला टोळीचे सत्य सांगितले.
> या घरातील लोकांचा व्यवहार चांगला असल्याचे पाहून तिला आता त्यांच्यासोबतच राहायचे आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...