आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघातात रस्त्यावर विखुरले मृतदेह, आई-मुलगी-वडील जागीच ठार, मर्सिडीझने दिली धडक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करनाल - करनालच्या घरौंडा टोल नाक्यावर रविवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात एका मर्सिडीझ कारने होंडा सिटी कारला धडक दिली. या कारमध्ये असलेल्या सीएनजी सिलिंडर प्रेशरमुळे वॉलपासून वेगळा होऊन गाडीच्या मागच्या भागाला फाडत काही मीटर दूर अंतरावर जाऊन पडला. अपघातात होंडा सिटी कारमध्ये स्वार पती-पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. दोन इतर जखमी झाले आहेत. मृत मुलांचे मृतदेह पूर्णपणे क्षतिग्रस्त झाले. जखमींना करनालच्या एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मर्सिडीझ कार स्वार सुरक्षित आहे. पोलिस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना सकाळी 7.10 वाजताची आहे. दिल्लीतून होंडा सिटी कारमध्ये स्वार होऊन एक कुटुंब पोंटासाहिबला जात होते. कारमध्ये गुरदीप (55), पत्नी गुरमीत कौर (54), मुलगी जसप्रीत कौर (30), जावई कुलविंदर (32), मुलगा अमनदीप (26) स्वार होते. 
- घरोंडा टोल नाक्याच्या आधी होंडा सिटी कारने दिल्लीकडे यूटर्न घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दोन इतर गाड्याही मागे राहिल्या होत्या. यादरम्यान चंदिगडकडून येणाऱ्या एका मर्सिडीझने जोरदार धडक दिली.
- धडक होंडा सिटी कारच्या मागच्या बाजूला बसली. यामुळे गाडीच्या आत फिट असलेली सीएनजी सिलिंडर वॉलपासून वेगळे होऊन गाडीच्या मागच्या हिश्शाला फाडत काही मीटर अंतरावर जाऊन पडले.
- या अपघातात गुरदीप, पत्नी गुरमित कौर आणि मुलगी जसप्रीतचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तिघांचेही मृतदेह चिरडले गेले. 
- कुलविंदर आणि अमनदीप जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

पोलिसांची कारवाई सुरू
- - पोलिस तपासअधिकारी गुरदीप म्हणाले की, त्यांनी दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या आहेत.
- मृत दिल्लीचे रहिवासी आहेत.
- त्यांनी टोलआधीच यूटर्न घेतला तेवढ्यात अपघात झाला, पोलिस तपास करत आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, भीषण अपघाताचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...