आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडरूममध्ये या अवस्थेत आढळली विवाहिता, रात्री पतीने पत्नीसोबत केले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मल्हारगंजमध्ये राहणाऱ्या विवाहितेचा मृतदेह बेडरूममध्ये आढळला. - Divya Marathi
मल्हारगंजमध्ये राहणाऱ्या विवाहितेचा मृतदेह बेडरूममध्ये आढळला.

इंदूर - मल्हारगंज परिसरात एका विवाहितेच्या हत्येने खळबळ उडाली आहे. विवाहिता बेडरूममध्ये मृतावस्थेत पडलेली आढळली. सूत्रांनुसार, पती-पत्नीत रात्रीच्या वेळी मोठा वाद झाला होता, यानंतर पतीने तिची हत्या केली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मल्हारगंज पोलिसांनुसार, मृत विवाहिता सफेद मशीद परिसरातील राहणारी मेहजबी बी आहे. ती एका दिवसापूर्वीच आपल्या माहेरातून पतीसोबत इंदुरात सासरी आली होती. रात्रीच्या वेळी तिचे आणि पती रफीकचे काही कारणावरून जोरदार भांडण झाले.

 

पप्पांनीच मम्मीचा गळा दाबला...

- वाद एवढा वाढला की, पती तिला मारहाण करायला लागला आणि रागात येऊन तिचा गळा आवळला. मृत मेहजबी बी हिची मुलगी तमन्ना आणि मुलगा अल्तमशने सांगितले की, रात्री पप्पा आणि मम्मीमध्ये खूप भांडण झाले होते, नंतर पप्पांनी मम्मीचा गळा दाबला. मम्मी यानंतर बेडवरून उठलीच नाही. 

- हत्येची माहिती मिळताच मल्हारगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पती रफीकला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून ते नातेवाइकांना सोपवले आहे. पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत. यांनतरच या हत्याकांडाचा खुलासा होऊ शकेल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित आणखी फोटोज....  

बातम्या आणखी आहेत...