‘इतिहासाचे पुनर्लेखन होत आहे, गोडसेच जास्त देशभक्त: ममता बॅनर्जी यांची टीका
कोलकाता- स्वत:च्या स्वार्थासाठी एका राजकीय पक्षाकडून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. स्वत:च्या स्वार्थापोटी इतिहासाचे पुनर्लेखन सुरू असेल तर भावी पिढी खऱ्या इतिहासापासून वंचित राहील, अशी टीका भाजपचे नाव न घेता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. कोलकाताच्या जाधवपूर विद्यापीठात सुरू असलेल्या इंडियन हिस्ट्री काँग्रेस चर्चेत ममता बॅनर्जी बोलत होत्या. इतिहासाचे विकृ़तीकरण करणे गुन्हा आहे. संघीय राज्यपद्धती, घटना आणि भूतकाळ तसेच इतिहासाचा नेहमी आदर केला पाहिजे, असे सांगून त्या म्हणाल्या, ज्या पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण होत आहे, त्यावरून नथूराम गोडसे महात्मा गांधीहून अधिक देशभक्त होते, असे वाटू लागले आहे, असा टोमणा त्यांनी लगावला.