आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी निवडणुकीत रालोआला 100च जागा मिळणार, ममता बॅनर्जींचा भाजपवर घणाघात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- कोलकात्यातील जाहीर सभेला १० लाखाहून अधिक लोकांची गर्दी उसळली होती.

- तृणमूल कांग्रेस 15 ऑगस्टपासून 'बीजेपी हटाओ, देश बचाओ' अभियान सुरू करणार आहे 

 

कोलकाता - लोकसभेत अविश्वास प्रस्तावादरम्यान मतदान राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूने झाले आहे. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रालोआला १०० जागांवर समाधान मानण्याची वेळ येणार आहे, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार, आेडिशा, पश्चिम बंगाल व तमिळनाडूमध्ये भाजपच्या जागांत घट होईल.


मिदनापूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी साधा मंडप लावू न शकणाऱ्यांना देश काय घडवता येईल ? असे सांगून ममतांनी जाहीर सभेत 'भाजप हटाआे, देश बचाआे' अशी घोषणा करून मोहिमेची सुरूवात केली. भाजपच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या ममता म्हणाल्या, आम्ही भाजपच्या हिंदूत्वावर विश्वास ठेवत नाहीत. ते हिंदूंची बदनामी करत आहेत. आमचे हिंदूत्व माता काली, दुर्गा, बजरंग बली व गणपती हे आहेत. मुख्यमंत्री म्हणाल्या, भाजप व संघात काही चांगली लोकही आहेत. त्यांचा मी सन्मान करते. परंतु काही लोक घृणास्पद खेळ करत आहेत, असा आरोप ममतांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये ४२ जागी विजय मिळवेल, असा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. भाजपला सत्तेपासून दूर केले तरच देशाचे भवितव्य सुरक्षित राहील, असे ममतांनी म्हटले आहे. सध्या तृणमूल काँग्रेसचे लाेकसभेत पश्चिम बंगालमधून ३४ खासदार आहेत.भाजपला नमवण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन करण्याची संकल्पना बॅनर्जी यांनी मांडली आहे. आम्हाला खुर्चीचा मोह नाही. आम्हाला केवळ या देशातील जनतेशी देणे-घेणे आहे, असे ममतांनी सांगितले.

 

भाजप सोडणारे चंदन मित्रासह काँग्रेसचे ५ आमदार तृणमूलमध्ये : भाजपची साथ सोडणारे चंदन मित्रा व पश्चिम बंगाल काँग्रेसचे पाच आमदारांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यात सत्ताधारी तृणमूलच्या वतीने दरवर्षी शहिद दिनानिमित्त सभेचे आयोजन करण्यात येते. या सभेत आमदारांनी तृणमूलमध्ये आैपचारिक प्रवेश करताना सदस्यत्व स्वीकारले. काँग्रेस आमदार सबिना यास्मीन, अबू ताहिर, कमरुज्जमा, समर मुखर्जी व मोइनुल हसन यांनी तृणमूलची वाट धरली.

 

जानेवारीमध्ये रणनीती
भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांची सभा जानेवारीत आयोजित करण्यात येणार आहे. त्यात भाजपला सत्तेपासून दूर करण्याची रणनीती ठरवली जाईल, असे ममता यांनी सांगितले.

 

 

बातम्या आणखी आहेत...