आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 2 दिवसांनीच पुसले कुंकू, पत्नीने सांगितले का झाला पतीचा मर्डर..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित नवरी म्हणाली, लग्नाआधी तिचे एका तरुणाशी फोनवर बोलणे होत होते. - Divya Marathi
पीडित नवरी म्हणाली, लग्नाआधी तिचे एका तरुणाशी फोनवर बोलणे होत होते.

कानपूर - आपल्या प्रेयसीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी झाल्यामुळे संतापलेल्या प्रियकराने तिच्या लग्नाच्या दोनच दिवसांनी तिची पतीचा मर्डर केला. विवाहितेच्या हातावरचा हळदीचा रंग अजून उतरला नव्हता, पण निर्घृण हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पीडितेने सांगितले की, तिला माहिती नव्हते की तिचा आरोपी प्रियकर तिच्यासोबत असे काही करेल. 

 

असे आहे पूर्ण प्रकरण... 
-ही घटना कानपूरच्या पुखराया वस्तीतील आहे. सूत्रांनुसार, येथील रहिवासी लाखन सिंग दिल्लीत एका खासगी कंपनीत जॉब करत होता. गत 10 फेब्रुवारी रोजीच सामूहिक विवाह सोहळ्यात त्याचे लग्न झिझकची रहिवासी प्रियंकाशी झाले होते.
-यानंतर दुसऱ्यांदा तो 11 फेब्रुवारी रोजी प्रियंकाच्या घरी आपल्या नातेवाइकांसह वरात घेऊन गेला होता. तेथून परतल्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी घरसामान खरेदी करून घरी आला आणि नंतर बाइकवर स्वार होऊन बाहेर निघून गेला.

-संध्याकाळी उशिरापर्यंतही तो घरी परतला नाही तेव्हा कुटुंबीयांनी त्याला फोन केला, परंतु फोन लागला नाही. यानंतर कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
-15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी उशिरा पोलिसांना माहिती मिाली की, यमुना नदीच्या पुलावर एक बाइक उभी आहे. चौकशीत कळले की, बाइक लाखन सिंगची आहे. यानंतर शोध घेतला असता परिसरात त्याचा मृतदेहही आढळला.

 

पीडित नवरीने सांगितले असे काही...
-घटनेनंतर प्रियंका म्हणाली, लग्नाच्या आधी तिचे अजय गोयल नावाच्या तरुणाशी फोनवर बोलणे व्हायचे. तिला माहिती नव्हते की, लग्नानंतर तो तिच्या पतीचीच हत्या करीन.
-मृत लाखनचे कुटुंबीय म्हणाले की, लग्नानंतर प्रियंकाकडून त्याने तिच्या पतीचा नंबरही घेतला होता. यानंतर तो तो तिला व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवू लागला आणि प्रियंकासोबत काढलेले आपले फोटो पाठवू लागला. परंतु बदनामीच्या भीतीने लाखनने ही गोष्ट लपवलेली होती. कारण, लाखन प्रियंकाशी लग्न करून खुश होता.

 

काय म्हणतात पोलिस अधिकारी...
-कानपूरचे (ग्रामीण) एसपी रतनकांत पांडेय म्हणाले, कुटुंबीयांनी आधी तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. 13 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. 15 रोजी त्याचा मृतदेह यमुना नदीत आढळला. मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. रिपोर्ट आल्यावर उलगडा होईल. यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...