आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रुर बापाने आधी मोठ्या मुलीचा गळा दाबला, नंतर छोट्या मुलीसोबत घेतले पेटवून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवभोग (छत्तीसगड)- येथे एका 40 वर्षीय बापाने आधी आपल्या मोठ्या मुलीचा जिव घेतला आणि नंतर दुसऱ्या खोलीत जाऊन आपल्या दोन महिण्याच्या चिमुकलीवर प्रेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. छोट्या मुलीला आग लवाण्याआधी नराधम बापाने संपूर्ण घरात खुप जास्त प्रमाणात पेट्रोल शिंपले होते, यामुळे मोठी आग लागली होती. आग एवढी भयानक होती की, खोलीत लावलेला सिंलिंक फॅनचे पाते विरघळे होते आणि संपूर्ण खोली धुराने भरली होती.


पति आणि मुलींना वाचवण्यासाठी पोहोचलेली पत्नी देखील होरपळली...
- देवभोग टेमरा गावातील ही घटना आहे. येथे पेशाने शिक्षक असलेल्या सुधीर पात्र याने मोठ्या मुलीची हत्या केल्यानंतर दोन महिण्याचा चिमुकलीला पेटवून दिले. या घटनेत पतिला आणि मुलींना वाचवण्यासाठी गेलेली पत्नी होरपळी आहे. नातेवाइक आणि शेजारी तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अग्रह करू लागले परंतु, ती घर सोडून जाण्यास तयार नव्हती. या घटनेमुळे धक्यात असलेली कविता सतत रडापड करत कधी पतीच्या तर कधी मुलींच्या मृतदेहाला अलिंगन देत होती. तिला उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.
- कविताने सांगितले की, रात्री उशीरा साडे 3 वाजेच्या दरम्यान मुलीच्या रडण्याच्या आवाजाने ती जागी झाली. ती घरातील समोरच्या खोलीत पोहोचली तेव्हा, पति आणि मुलगी दोघेही आगीच्या ज्वाळात होरपळत होते. आरडाओरड करत कविता त्यांना वाचवण्यासाठी स्वत: आगिच्या दिशेने धावली. तोपर्यंत आसपासचे लोक पोहोचले होते आणि त्यांनी कविताला आगीतून ओडून घेतले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला.
- गिरशुल प्रायमरी स्कुलमध्ये शिक्षक सुधीर यांच्या कुटुंबात आई-वडिल, पत्नी आणि दोन मुलींसह एकूण सहा लोक राहत होते.


5 वर्षांपासून सुरू होते उपचार, 3.5 लाखांचे होते कर्ज...
सुधीरचे वडिल त्र्यंबक 5 वर्षांपासून कँसरने पीडित आहेत. घरातील सर्व कमाई त्यांच्या उपचारात खर्च झाली. मुंबई येथे त्यांचे उपचार सुरू होते. सुधीर एकटाच कमवणारा होता, सर्व काही त्याच्या 18 हजारांच्या पगारावर सुरू होते. उपचारासाठी त्याने ग्रामीन बँकेतून 3.5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. अजून 2.5 लाख रुपये परत करणे बाकी होते.


आज होते छोट्या मुलीचे नामाकरण...
सुधीरची छोट्या मुलीचे नामकरण संस्काराच्या कार्यक्रम रविवारी ठेवण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठा नव्हता, परंतु तरी देखील घरात आनंदाच्या क्षणी नातेवाइक आणि मित्रमंडली जमा होणार होते. कविताने सांगितले की, एका आठवड्यापूर्वी सुधीरने एका बॉटलमध्ये पेट्रोल भरून आणले होते. तिने प्रेट्रोल आणण्याचे कारण विचारले तेव्हा सुधीरने बोलने टाळले होते.


मुलीच्या गळ्यावर बोटांचे निशान...
पोलिसांनुसार, प्रकरणाचा सुरूवातीच्या तपासात आत्महत्या आणि हत्या अशा दोन्ही बाजूनी तपास करण्यात येत होता. परंतु, नंतर मोठ्या मुलीच्या गळ्यावर बोटांचे निशान आढळून आल्याने बापाने मोठ्या दोन्ही मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...