आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेचे दुसऱ्या पुरुषाशी होते रिलेशन, तिसरा मध्ये आल्याने उसाच्या शेतात नेऊन केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उसाच्या शेतात विवाहितेचा मृतदेह आढळला. - Divya Marathi
उसाच्या शेतात विवाहितेचा मृतदेह आढळला.

सुरत - कामरेजमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला आहे. पोलिस म्हणाले की, कोसमाडा गावातील उसाच्या शेतात महिलेचा खून झाला होता. याप्रकरणी तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. आरोपी प्रियकरला त्याची विवाहित प्रेयसी वर्षाचे आणखी कुणाशीतरी संबंध असल्याचा संशय आला, यामुळेच त्याने तिचा खून केला.

 

तिसऱ्याशी जवळीक वाढल्याने गेला जीव
- वर्षा आपली तीन मुले आणि पती प्रवीण जाला यांच्यासोबत वराछा परिसरातील नीळकंठ सोसायटीत रहात होती. वर्षाचे तीन वर्षांपासून भरत अग्रवालशी प्रेमसंबंध होते.
- यादरम्यान वर्षाचे राजू आहिर नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. हे भरतला कळल्याने त्याने कोसमाडा गावात नेऊन तिचा खून केला.
- खबऱ्याने पोलिसांना कळवले की, आरोपी प्रेमी भरत नॅशनल हायवे 8वर कामरेजकडून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ उभा आहे. पोलिसांनी नाकेबंदी करून आरोपी भरत अग्रवाल आणि खुनात सहभागी एका अल्पवयीन मुलालाही अटक केली आहे.
- भरतची चौकशी केल्यावर तो म्हणाला की, वर्षासोबत माझे तीन वर्षांपासून अफेअर होते, पण वर्षा आता राजू आहिरवर प्रेम करू लागली होती. अनेक वेळा तिला असे करायला मनाई केली, पण ती ऐकत नव्हती, म्हणून मारून टाकले.

 

एक अल्पवयीनही सामील

- भरतने जबाब दिला की, वर्षाचा खून करण्यासाठी अगोदर चाकू आणि कटर खरेदी केले. लक्झरी बसमधून टॉमीही चोरली. मग वराछामध्ये फुटपाथवर राहणाऱ्या अल्पवयीन मुलाला सोबत घेतले.
- त्यालाही वर्षाचा खून करायला राजी केले. यानंतर वर्षाला बाइकवर बसवून कोसमाडा गावातील उसाच्या शेतात नेले.
- वर्षा भरतशी बोलत असताना इशारा मिळताच अल्पवयीन मुलाने टॉमीने वर्षाच्या डोक्यावर वार केले. वर्षा खाली कोसळताच भरतने तिच्या मानेवर चाकू फिरवला आणि तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून खून केला.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाशी संबंधित फोटोज...

बातम्या आणखी आहेत...