आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीशी मित्राचे अवैध संबंध कळल्याने पतीने जीभ अन् प्रायव्हेट पार्ट कापून घेतला बदला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागलपूर - गतवर्षी 16 डिसेंबर रोजी हायस्कूलच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विवाहित कथित प्रेयसीसहित 3 जणांना अटक केली आहे. कथित प्रेयसी निशूचे मृत 19 वर्षीय मदन कुमारशी अवैध संबंध होते. निशू मदनच्या मित्राची पत्नी होती. या प्रेमप्रकरणाची माहिती निशूचा पती पिंटूला झाली होती. यानंतर मदनची हत्या करण्यात आली होती.

 

मृत मदनच्या नातेवाइकांनी आरोपीला पकडले...
- सूत्रांनुसार, मृत मदनच्या नातेवाइकांनी नीशू देवी, तिचे वडील पप्पू दास आणि काका दुलारे दास यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
- याप्रकरणी मुख्य आरोपी नीशूचा पती पिंटू ऊर्फ बोंगाला अटक होऊ शकलेली नाही. घटनेनंतर तो फरार आहे.

 

असे आहे प्रकरण...
- निशूचे मदनसेाबत अवैध संबंध होते. याची माहिती तिच्या पतीला झाली.
- 16 डिसेंबरच्या संध्याकाळी मदन गल्लीतील पिंटूसोबत बर्थ-डे पार्टी करण्यासाठी घराबाहेर निघाला. यानंतर तो बेपत्ता होता. 
- वडील मनोज दास म्हणाले की, पिंटूची नवविवाहित पत्नी निशू देवीशी त्याचे प्रेमप्रकरण सुरू होते.
- निशू माझ्या मुलाला सारखी पळून जाण्यासाठी दबाव टाकत होती. यामुळेच निशूच्या पतीने त्याच्या इतर नातेवाइकांच्या मदतीने हत्या केली. 
- त्यांनी मदनचा गळा चिरला. सोबतच प्रायव्हेट पार्ट आणि जीभही कापून घेतली. आरोपी भागलपूर स्टेशनवर स्वच्छतागृहात काम करतो.

 

निशूने लिहिलेली 16 प्रेमपत्रे मदनच्या घरातून हस्तगत
- वडील म्हणाले की, निशूने माझ्या मुलाला जाळ्यात ओढले होते. तिने लिहिलेली 16 प्रेमपत्रे मदनच्या बॅगमधून हस्तगत झाली.
- दोघांनी शारीरिक संबंधही बनवले होते. यामुळे निशू गर्भवती झाली होती. ही गोष्ट निशूच्या पतीला कळली होती.
- त्यांनी कट रचून वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मदनला बोलावले आणि त्याची हत्या केली.

 

पिंटूने दिली होती खुनाची धमकी...
- मृत मदनचे वडील म्हणाले की, त्यांच्या मुलाला शेजारी पिंटूने किडनॅप करण्याची धमकी दिली होती. त्याला मदनचे त्याच्या पत्नीशी अवैध संबंध कळले होते.
- यामुळे पिंटूने याआधीही त्याला बेदम मारहाण केली होती. त्याने धमकी दिली तेव्हा वाटले नव्हते की तो ती खरी करीन. पण त्याने खरोखरच माझ्या मुलाची हत्या केली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज..

बातम्या आणखी आहेत...