आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत बंदच्या यशामुळे भाजप भयभीत, आता त्यांनी दलितांवर अत्याचार सुरू केले: मायावती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- बसपा प्रमुख मायावती यांनी रविवारी भारत बंद वरून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे बंद यशस्वी झाला. यामुळे आता भाजप भयभीत झाले आहे, ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, तेथील अधिकाऱ्यांनी दलितांवर अत्याचर करण्यास सुरूवात केली आहे, अनेकांना अटक करण्यात येत आहे, असे आरोप मायावती यांनी भाजपवर केले आहेत.  सामान्य जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असे यावेळी बोलताना मायावती यांनी म्हटले आहे.
 

भाजप दलित खासदार स्वार्थी...
मायावती म्हणाल्या की, मला विश्वास आहे देशातील स्वाभिमानी जनता दलित समाजातील स्वार्थी मानसिकता असलेल्या भाजपच्या खासदारांना माफ करणार नाही.


भाजपतील दलित खासदार मोदी सरकारवर नाराज...
- भाजपमधील 4 दलित खासदारांनी दलितांच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. यात यशवंत सिंह, आशोक दोहरे, छोटेलाल खरवार आणि उदित राज यांचा समावेश आहे.
- दुसरीकडे, बहराइचच्या खासदार सावित्री बाई यांनी सरकार आरक्षण संपवण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला आहे.

बातम्या आणखी आहेत...