आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचल प्रदेशमधील कांग्रामध्ये कोसळले वायुदलाचे MiG-21 विमान, अपघातात पायलटचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिमला - भारतीय वायुदलाचे मिग 21 हे लढाऊ विमान हिमाचल प्रदेशमधील कांग्रा जिल्ह्यात जवलीजवळ क्रॅश झाल्याची माहिती मिळाली आहे. वायुदलाचे हे विमान पंजाबच्या पठाणकोटहून निघाले होते. या अपघातात विमानाच्या पायलट मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. बचाव पथकाने मदत कार्य सुरू केले. 

 

वायुसेनेचे हे मिग-21 लढाऊ विमान नेहमीप्रमाणे ट्रेनिंगवर असताना दुपारी सव्वा एकच्या सुमारास क्रॅश झाले. हिमाचल प्रदेशच्या कांगरा जिल्ह्यात हा अपघात झाला. अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी या प्रकरणाच्या चौकशीचे (कोर्ट ऑफ इन्क्वायरी) आदेश देण्यात आले आहेत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...