आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत: बनला पती अन् बहिणीलाच दाखवले आई; प्रेयसीचे अबॉर्शन करायला घेऊन गेला प्रियकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर - येथील बिरसानगरात मागच्या दोन दिवसांपासून बेपत्ता 10वीची विद्यार्थिनी रविवारी साकचीच्या लाइफ लाइन नर्सिंग होममध्ये भेटली. तिला 7 महिन्यांचा गर्भ आहे. तिचा गर्भपात करण्यासाठी तयारी सुरू होती. आरोपी प्रियकर राजीव रंजन सिंह आणि त्याची बहीण अंजलीने तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. हॉस्पिटलच्या अॅडमिट पेपरवर राजीवने स्वत:चे नाव विनोद सिंह सांगून स्वत:ला त्या मुलीचा पती असल्याचे सांगितले, तर बहीण अंजलीला तिची आई दाखवले.

 

गुरुवारपासून घरातून बेपत्ता होती, आईने केली पोलिसांत तक्रार
अल्पवयीन मुलगी गुरुवारपासून बेपत्ता होती. शुक्रवारी तिने आईला माहिती दिली की, ती आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी आली आहे. दुसऱ्या दिवशीही ती आली नाही तेव्हा कुटुंबीयांनी बिरसानगरातून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. पोलिसांनी गरुडबासा येथील रहिवासी राजीव कुमार सिंह यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. राजीव म्हणाले की, मुलीला लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. बिरसानगर पोलिस स्टेशन इंचार्ज उपेंद्र सिंह आणि घटनेची माहिती मिहाल्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कल्याणी शरण या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या.

 

पोलिस चौकशीत झाला खुलासा, पती आणि आई दोन्ही बनावट
अल्पवयीन मुलीच्या आईने ज्यांनी शुक्रवारी रात्री पोलिसांत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती, त्यांनी आपल्या मुलीची ओळख पटवली. त्या मुलीला गर्भपात करण्यासाइी स्लाइन (वेदना होणारे) चढवले जात होते. महिला आयोगाच्या अध्यक्षा लेबर रूममध्ये गेल्या असता त्यांनी सलाइन हटवले. महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर गर्भपात रोखण्यात आला. पोलिस चौकशीत पति आणि आई दोन्ही बनावट असल्याचे उघड झाले. आरोपी तरुण त्या मुलीच्या आईवर प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकत होता. 

 

मुलगी म्हणाली- मी राजीवशी लग्न केलेले आहे...
पोलिसांना दिलेल्या जबाबात मुलगी म्हणाली की, तिने राजीवशी 23 फेब्रुवारी 2017 रोजी रंकिणी मंदिरात लग्न केले आहे. यानंतर ती त्याला सातत्याने भेटत राहिली. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, आरोपी राजीववर टेल्को पोलिस स्टेशनमध्ये चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे. त्याला तुरुंगवासही झालेला आहे.

 

गर्भपाताची तयारी करणारी डॉक्टर महिला फरार...
अल्पवयीन मुलगी ज्या शाळेत दहावीत शिकते, त्याच शाळेत आरोपीची बहीण शिक्षिका होती. महिला आयोग आणि पोलिस पोहोचल्यावर नर्सिंग होमच्या लेबर रूममध्ये बेपत्ता मुलगी आढळली. बिरसानगर पोलिस स्टेशन इंचार्ज उपेंद्र सिंह आपल्या टीमसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचले असता त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने त्यांना आत जाता आले. अल्पवयीन मुलीच्या आईच्या जबाबावरून संध्याकाळी उशिरात लग्नाचे आमिष दाखावून लैंगिक शोषण आणि चुकीच्या पद्धतीने गर्भपात करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. दुसरीकडे, या प्रकरणात नर्सिंग होम संचालकाची मिलीभगत असल्याचे समोर आले आहे. छापा पडताच डॉक्टर महिला फरार झाली.

 

महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणाल्या..
कल्याणी शरण म्हणाल्या की, हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या भूमिकेची आणि त्यांच्या कार्यप्रणालीची चौकशी झाली पाहिजे. 7 महिन्यांचा गर्भ असल्यावर गर्भपाताच्या आधी अनेक कायदेशीर प्रकि्रया पूर्ण कराव्या लागतात. त्या म्हणाल्या की, अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला पाहिजे. तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही हे प्रकरण आव्हान समजून पाठपुरावा करत राहू.

 

ट्यूशनचे सांगून निघाली होती घराबाहेर...
बिरसानगर पोलिसांत अल्पवयीन मुलीच्या आईने शुक्रवार लेखी तक्रार दिली होती. आईच्या मते, त्यांची मुलगी सकाळी ट्यूशनला चालले असल्याचे सांगून गेली होती. संध्याकाळी उशिरापर्यंत वेगवेगळे बहाणे सांगत राहिली, पण घरी आली नाही. नंतर तिचा फोनही स्विच ऑफ झाला.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज....

बातम्या आणखी आहेत...