आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा पत्रकारावर गुंडाचा हल्ला, पत्नीने रिव्हॉल्व्हर रोखताच केला पोबारा; थरार CCTV मध्ये कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये गुंडांनी एका पत्रकारावर त्याच्या घराबाहेर हल्ला केला. पतीवर हल्ला होत असल्याचे पाहिल्यानंतर पत्नीने रिव्हॉल्व्हरने गुंडांवर फायरींग सुरु केली तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. पत्रकाराने हल्ल्याची तक्रार दिली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच हल्लेखोरांना अटक केले जाईल असे सांगितले आहे. 

 

काय आहे प्रकरण
- लखनऊमधील काकोरी पोलिस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे. रविवारी पत्रकार आबिद अली यांना घराबाहेर बोलावून काही जण त्यांच्यासोबत बोलत होते. याच दरम्यान, काही नकाबपोश तिथे आले. लाठ्या-काठ्यांनी त्यांनी आबिद यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. 
- घराबाहेरचा गदारोळ ऐकून आबिद यांच्या पत्नी बाहेर आल्या. त्यांनी आपल्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने पतीवर हल्ला करणाऱ्यांवर फायरिंग केले. 
- रिव्हॉल्व्हर पाहाताच गुंडांनी तिथून पोबारा केला. 
- हल्ल्यात आबिद यांच्या मान, पाठ, डोके आणि हाताला जोरदार मार बसला आहे. 
- आबिद यांनी गुंडांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही. 
- काकोरी पोलिस स्टेशनचे अधिकारी संजय पांडे म्हणाले, 'गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत. लवकरच हल्लेखोरांना पकडले जाईल.'

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पतीला मारहाण होत असताना पत्नीने दाखवलेली हिंमत... 

बातम्या आणखी आहेत...