आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्‍थान विधानसभा निवडणुकीच्या 5 महिने आधी मोदींची जयपूरसाठी 2100 कोटींची योजना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पाच महिने आधी शनिवारी जयपूरला दाखल झाले. त्यांनी येथे वसुंधरा राजे सरकारबद्दल कौतुकोद्गारही काढले. त्याचबरोबर काँग्रेसवर खरपूस टीकाही केली. तत्पूर्वी त्यांनी २१०० कोटी रुपयांच्या १३ विकास योजनांच्या प्रकल्पांचा कोनशिलेद्वारे प्रारंभ केला.

 

मोदी यांनी जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून केेंद्र व राज्य सरकारच्या १२ योजनांतून लाभ मिळवणाऱ्या लोकांशी संवाद साधला. त्यापैकी काही लाभार्थींशी त्यांनी व्यासपीठावर समाेरासमोर चर्चाही केली. गेल्या दोन वर्षांत देशातील ५ कोटी लोक गरिबीतून मुक्त झाले आहेत, असा दावा मोदींनी एका सामाजिक संस्थेच्या अहवालाचा हवाला देत केला. राजस्थानात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुमारे ८० लाख स्वच्छतागृह तयार करण्यात आले. २.५ कोटींहून जास्त जनधन खाते सुरू झाले. आमच्या सरकारमध्ये योजना लटकत नाहीत, भरकटतही नाहीत. केवळ विकास केला जातो. काँग्रेस सरकारच्या काळातील चार वर्षांपूर्वीची स्थिती तुम्हाला आठवत असावी. मागील सरकारने राज्याला अत्यंत वाईट स्थितीत सोडले होते, असा आरोप त्यांनी केला.

 

विधानसभा निवडणुकीपूर्वी  राज्यांवर मोदींचे लक्ष  
चालू वर्षाच्या अखेरीस चार राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराममध्ये ही निवडणूक होईल. हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी निवडणूक असलेल्या राज्यांत सरकारी योजनांचा शुभारंभ करू लागले . मोदी गेल्या महिन्यात मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी सिंचनासह अनेक योजनांचा शुभारंभ केला होता. त्या अगोदर छत्तीसगडचा दौराही त्यांनी केला होता.

 

काँग्रेस आता ‘बेल’ गाडी !
मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या नेत्यांवर खरपूस शैलीत टीका केली. त्यांना न्यायालयाकडून बेल (जामीन) घ्यावा लागला आहे. मोदी त्याचा संदर्भ देत म्हणाले, ‘काँग्रेसला आजकाल बेलगाडी म्हटले जाऊ लागले. बैलगाडी नव्हे. कारण अनेक नेते जामिनावर आहेत. शशी थरूर पत्नीच्या मृत्यू प्रकरणी जामीनावर आहेत.  माजी मंत्री पी. चिदंबरम यांनाही आयएनएक्स मीडिया प्रकरणात न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला. त्यापूर्वी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व सोनिया गांधी यांनाही जामीन मिळवावा लागला होता.

बातम्या आणखी आहेत...