आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहाजहापूरच्या सभेत मोदी म्हणाले-जितने दल मिलेंगे, दलदल बनेगा और इसी में कमल खिलेगा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- मोदी म्हणाले - आम्ही वीज घेऊन पळतोय आणि ते अविश्वासाचा कागद घेऊन पळत आहेत

- पंतप्रधान असेही म्हणाले की, पंतप्रधानांच्या खुर्चीशिवाय विरोधकांना दुसरे काहीही दिसत नाही


शहाजहापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी एका आठवड्यात दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशात पोहोचले. शनिवारी शहाजहापूरमध्ये 'किसान कल्याण रॅली' मध्ये नाव न घेता त्यांनी राजीव गांधी आणि राहुल गांधींवर टीका केली. मोदी म्हणाले की, एक पंतप्रधान म्हणाले होते, योजनांसाठी दिल्या जाणाऱ्या एका रुपयातील पक्त 15 पैसेच लोकांपर्यंत पोहोचतात. मग कोणता पंजा रुपयाला घासत होता. आज जे मगरीचे अश्रू गाळत आहेत, त्यांच्याकडे तेव्हा विचार करायला वेळ नव्हता. 


मोदी यावेळी म्हणाले, जेवढे पक्ष एकत्र येत जातील तेवढा चिखल वाढेल आणि जेवढा जास्त चिखल होईल तेवढेच कमळ जास्त फुलत असते. अहंकार, दंभ आणि और दबाव सहण करण्यास आजचा तरुण भारत तयार नाही. मग सायकल असो, हत्ती असो की कोणीही असो. स्वार्थाचे हे सोंग लोकांना उमगले आहे. तुम्हाला माहिती आहे खुर्चीसाठी सगळे कसे पळत आहेत. खुर्चीपुढे त्यांना शेतकरी, सैनिक कोणीही दिसत नाही. काल संसदेत आम्ही अविश्वासाचे कारण विचारत राहिलो तर सांगता आले नाही, शेवटी भांडायला लागले. 


125 कोटी भारतीयांची शक्ती 
मोदी म्हणाले, मी काही चूक केली आहे का? चुकीच्या मार्गावर चाललो का? माझा गुन्हा हाच आहे की, मी भ्रष्टाचारा विरोधात लढतोय. वंशवादाविरोधात लढतोय. काही पक्ष म्हणतात, त्यांना मोदींवर विश्वास नाही. आम्ही त्यांना समजावतो की, असा खेळ खेळू नका. जनतेच्या नादी लागू नका. मोदी काहीच नाही. ही शक्ती 125 कोटी भारतीयांची आहे. 

 

रामप्रसाद बिस्मिलची आठवण 
मोदी म्हणाले, बिस्मिल यांची भूमी असलेल्या शहाजहापूरला मी प्रणाम करतो. बिस्मिल यांगे योगदान देशासाठी प्रेरणादायी आहे. काही दिवसांपूर्वी युपी, पंजाब, राजस्थान, बंगालमध्ये शेतकऱ्यांना भेटण्याची संधी मिळाली. मी ज्याही ठिकाणी गेलो आमच्या अन्नदात्याने मला आणि भाजपला जो आशिर्वाद दिला त्याने मी धन्य झालो. 


एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ 
मोदी म्हणाले, 14 पिकांच्या हमीभावात 200 ते 1800 रुपयांपर्यंतची वाढ इतिहासात आधी कधीही झालेली नाही. तुम्हाला उसाची शिल्लक लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. साखरेच्या आयातीवर आम्ही 100% टॅक्स लावला. 20 लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली. साखर कारखान्यांनी कारण शोधू नये म्हणून किमान आधारभूत किंमत ठरवली.

बातम्या आणखी आहेत...