आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवानांवर दगडफेक करणा-या 9730 तरुणांवरील खटले मागे घेण्यास मुफ्ती सरकारची मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - जम्मू-काश्मीरमध्ये २००८ ते २०१३ दरम्यान जवानांवर दगडफेक करणाऱ्या ९७३० तरुणांवरील खटले मागे घेण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या तरुणांचा हा पहिलाच गुन्हा होता, असे सांगण्यात येते. काही विशिष्ट अटींवर आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने छाननी केल्यानंतर सुमारे १७४५ खटले मागे घेण्यात आले, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिली. गेल्या दोन वर्षात दगडफेकीच्या किरकोळ घटनांत सहभागी असलेल्या सुमारे ४ हजार लोकांनाही आम माफी देण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

 

या सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली होती. विधानसभेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावर पहिल्यांदाच गुन्हा करणाऱ्या आरोपींची माहिती सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिलेली नाही. २०१६ व २०१७ मध्ये ३७७३ खटले दाखल करण्यात आले होते. त्यावरून ११,२९० लोकांना अटक करण्यात  आली. २३३ लोकांची अोळख पटलेली नाही. सात प्रकरणे अद्याप दाखल करण्यात आलेली नाहीत, तर १६९२ प्रकरणांत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १८४१ प्रकरणांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती मेहबूबा मुफ्ती यांनी लेखी उत्तरात दिली.  

 

८५७० लोक अटकेत  
मुख्यमंत्री मेहबूबा यांनी म्हटले, २०१६ मध्ये २९०४ खटले दाखल करण्यात आले आणि दगडफेकीत सहभागी असलेल्या ८५७० लोकांना अटक करण्यात आली. २०१७ मध्ये दगडफेकीच्या घटनांत घट झाली. सुमारे ८६९ प्रकरणांत २७२० जणांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती.  

 

५६ शासकीय कर्मचारीही दगडफेकीत आरोपी

  मुख्यमंत्री मेहबूबा यांनी सांगितले, जवानांवर दगडफेक करणाऱ्यांत ५६ शासकीय कर्मचारीही सहभागी होते. १६ हुरियत कॉन्फरन्सचे कार्यकर्ते होते. ४०७४ आरोपी कोणत्याही दहशतवादी संघटनेशी अथवा फुटीरतावादी गटाशी संबंधित नव्हते.

 

८५७० लोक अटकेत  
मुख्यमंत्री मेहबूबा यांनी म्हटले, २०१६ मध्ये २९०४ खटले दाखल करण्यात आले आणि दगडफेकीत सहभागी असलेल्या ८५७० लोकांना अटक करण्यात आली. २०१७ मध्ये दगडफेकीच्या घटनांत घट झाली. सुमारे ८६९ प्रकरणांत २७२० जणांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती.  

 

श्रीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे २३३० दगडफेक करणारे  
२०१६ आणि २०१७ मध्ये श्रीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे २३३० दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्यात आली. त्या खालोखाल बारामुल्ला येथे २०४६, पुलवामामध्ये १३८५, कुपवाड्यात ११२३, अनंतनाग येथे १११८ बडगाम येथे ७८३, गांडेरबल ७१४, शोपियां येथे ६९४, बांदीपोरा येथे ५४८, कुलगाम येथे ५४७ व डोडा जिल्ह्यात दोघांना अटक करण्यात आली होती. 


हिंसाचाराचे ८५ बळी  
हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या बुरहान वानी  जुलै २०१६ मध्ये पोलिस गोळीबारात ठार झाला होता. या दरम्यान, काश्मीर खोऱ्यात दगडफेकीच्या घटना वारंवार घडत होत्या. या वेळी उसळलेल्या हिंसाचारात ८५ लोक मृत्युमुखी पडले होते. 

बातम्या आणखी आहेत...