आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारागृहांची दुरवस्था ; यूपी, पंजाबच्या कारागृहांत 3 वर्षांत सर्वाधिक महिला कैद्यांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सर्वाेच्च न्यायालयाने गत अाठवड्यात देशातील कारागृहांतील कैद्यांच्या स्थितीची नॅशनल लिगल सर्व्हिस अथाॅरिटीकडून माहिती मागवली हाेती. महिला कैद्यांची दुरवस्था व पुनर्वसनाच्या मुद्द्याकडेही लक्ष देण्याचे अादेश केंद्र सरकारला देऊन महिला कैद्यांच्या स्थितीची वेगवेगळी माहितीही मागितली.


याबाबत ‘दिव्य मराठी’ने सरकारच्या विविध दस्तएेवजांची पडताळणी केली असता, उत्तर प्रदेश, पंजाब व मध्य प्रदेशातील कारागृहांत वर्ष २०१३ ते २०१५दरम्यान सर्वाधिक महिला कैद्यांचा मृत्यू झाल्याचे समाेर अाले. महाराष्ट्र, गुजरात व दिल्लीच्या कारागृहांतील महिला कैद्यांची स्थिती दयनीय असल्याचे अाढळून अाले. पाेलिस काेठडीत महिला कैद्यांवर बलात्काराच्या सर्वाधिक घटना उत्तर प्रदेशात घडल्या. लाेकसभा समितीच्या एका अहवालातून ही वास्तवता समाेर अाली अाहे. नैराश्यातून अात्महत्या करणाऱ्या महिला कैद्यांबाबतच्या घटना केवळ उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली व पुद्दुचेरीतच घडल्याचे उघडकीस अाले.

 

या राज्यांतील कारागृहांत सर्वाधिक महिला कैदी मनाेरुग्ण

कारागृहांत कैदी महिला मनाेरुग्ण बनण्यात उत्तर प्रदेश सर्वाेच्च स्थानी अाहे. तेथे २०१३ ते २०१५मध्ये ५४ महिला कैदी मानसिक राेगांनी ग्रस्त झाल्या. तसेच गुजरातमध्ये ४०, हरियाणा व दिल्लीत हा अाकडा ३०-३० अाहे. लाेकसभा समितीने अापल्या अहवालात ही वास्तवता सांगितली अाहे. 

 

यूपीत पाेलिस काेठडीत सर्वाधिक बलात्कार

उत्तर प्रदेशात २०१३, २०१४ व २०१५मध्ये २८० महिला कैद्यांवर पाेलिस काेठडीत बलात्कार झाल्याच्या घटना घडल्या. याशिवाय अरुणाचल प्रदेशात ४, राजस्थानात ३, उत्तराखंडात दाेन व कर्नाटक, पुद्दुचेरी व पश्चिम बंगालमध्ये अशा घटनांचे एक-एक प्रकरण घडले अाहे.  

 

 

बिहार, हिमाचल प्रदेशात एकही घटना नाही

बिहार, अरुणाचल, हिमाचल, मणिपूर, मेघालय, मिझाेराम, नागालॅण्ड, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, अंदमान-निकाेबार, चंदिगड, दमण-दीव, लक्षद्वीप व पुद्दुचेरीत एकही महिला कैदी मनाेरुग्ण न बनल्याचे अाढळले अाहे.

बातम्या आणखी आहेत...