आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्ष देण्यापूर्वीच मायलेकराचा खून; महिलेच्या पतीचीही दोन वर्षांपूर्वी झाली होती हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ-  उत्तर प्रदेशातील मेरठ जवळील परतापूर भागात पतीच्या हत्येचे प्रकरण सुरु होते. न्यायालयात साक्ष देण्यास जाण्यापूर्वीच विरोधी गटाच्या लोकांनी महिला व तिच्या मुलाची गोळ्या झाडून भर दिवसा हत्या केली. ही घटना बुधवार दि. २४ जानेवारी रोजी घडली. सोरखा येथील नरेंद्र याची ऑक्टोबर २०१६ मध्ये हत्या करण्यात आली होती. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचे सांगण्यात येत होते. या प्रकरणी मृताचा पुतण्या मालू व त्याचा सख्खा भाऊ मांगे यांच्यासह अन्य काही लोकांवर मृताच्या कुटुंबियांनी खटला दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्रच्या हत्येप्रकरणात त्याची पत्नी निछत्तर कौर व मुलगा बलविंदर उर्फ भोलू हे साक्षीदार होते. गुरुवारी त्यांची न्यायालयात साक्ष होणार होती. बुधवारी सकाळी ११.३० वाजता निछत्तर कौरवर कारमधूून आलेल्या गुंडांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. तर बलविंदरला रस्त्यात गोळ्या घातल्या. 

बातम्या आणखी आहेत...