आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढा भीषण अपघात, ट्रकखाली चिरडून आई-मुलाचा झाला चेंदामेंदा, रस्त्यावर विखुरले मांसाचे तुकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्नाव - यूपीच्या उन्नावमध्ये एका बाइकवरून जात असलेल्या आई-मुलाला भरधाव ट्रकने चिरडले. या अपघातात आई-मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. दुसरीकडे, घटनास्थळावरून पळून जात असलेल्या ट्रक ड्रायव्हरला रोडवरील इतर वाटसरूंनी धावत जाऊन पकडले. सूचना मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्वरित विखुरलेले मृतदेहांचे तुकडे गोळा केले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. 

 

कार्यक्रमातून घरी परतत होते आई अन् मुलगा...
- गंगाघाटचा रहिवासी अजितसिंह (22) आपली आई इंद्रजित कौर (63) यांना घेऊन गुरु गोविन्दनगर येथील कार्यक्रमासाठी गेला होता.
- कार्यक्रम संपल्यावर संध्याकाळी तो आपल्या आईसोबत बाइकवरून घरी परतत होता. यादरम्यान रस्त्यात एका मंदिराजवळ पोहोचताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या बाइकला जोरदार धडक दिली.
- धडक बसताच दोन्ही आई अन् मुलगा रस्त्यावर पडले आणि ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले. यात त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या उडून रस्त्यावर विखुरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 
- अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला लोकांनी धावत जाऊन पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. दुसरीकडे, मायलेकाच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.

 

काय म्हणतात पोलिस?
- सीओ सिटी सतेंद्र कुमार सिंह म्हणाले, "अपघातात आई-मुलाचा मृत्यू झाला आहे. ट्रकसहित त्याला ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. तक्रारीवरून पुढील कारवाई केली जाईल."

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी फोटोज....

बातम्या आणखी आहेत...