आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11व्या मजल्यावरुन 5 वर्षांच्या मुलाला फेकून आईनेही घेतली उडी, दोघांचाही मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर (उत्तर प्रदेश) - येथे एका महिलेने 11व्या मजल्यावरुन बाळाला फेकत स्वतः देखील  उडी घेतली. दोघांचीही जागेवरच मृत्यू झाला.  ही घटना रविवारी घडली आहे. 

 

काय आहे प्रकरण 
- कानपूरमधील पत्रकारपुरम येथील पवन अग्रवाल हे पत्नी जया आणि मोठा मुलगा पार्थ (8), धाकटा उत्कर्ष (6) यांच्यासोबत राहातात. पवन यांचे इंद्रानगर येथे दिव्यांसी अपार्टमेंट आहे. 
- ही अपार्टमेंट पवन यांनी किरायाने दिली आहे. रविवारी कुटुंबासह ते या अपार्टमेंटमध्ये आले होते. 
- अशी माहिती आहे की पवन रुममध्ये होते आणि त्यांचा मोठा मुलगा पार्थ गेटजवळ होता. पत्नी जया या उत्कर्षला घेऊन रोलिंगवर उभ्या राहिल्या. मोठ्या मुलासमोरच त्यांनी उत्कर्षला खाली फेकले. पार्थ पळतच वडिलांना हे सांगण्यासाठी धावला. त्याचवेळी जयानेही 11व्या मजल्यावरुन उडी घेतली. 
- मुलगा आणि आई खाली पडले तेव्हा मोठा आवाज झाला. गार्ड आणि अपार्टमेंटमध्ये राहाणारे लोक तिथे पोहोचले. त्यानंतर पती आणि मुलगाही पोहोचला. 
- दोघांना उचलून तत्काळ हॅलट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

 

लोक काय म्हणाले 
- 'मृत महिलाचा नंदोई निलेश कुमार म्हणाले, जया मानसिकदृष्टा आजारी होती. त्यामुळेच तिने आत्महत्या केली. अग्रवाल कुटुंब पत्रकारपुरम येथे राहाते. ही अपार्टमेंट त्यांनी किरायाने दिली होती. येथे ते आधुनमधून येत असायचे. आजही आले होते.' 
- पोलिस अधिकारी समीर कुमार म्हणाले, महिलेने मुलासोबत आत्महत्या केली. दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. 
- कानपूर पोलिस अधीक्षक अखिलेश मीणा म्हणाले, 'महिला आपल्या पती आणि मुलांसह फ्लॅट पाहाण्यास गेली होती. ती मानसिकदृष्टा आजारी होती. महिलेने आधी लहान मुलाला फेकले आणि नंतर स्वतः उडी घेतली. हॉस्पिटलना घेऊन जात असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची सविस्तर चौकशी सुरु आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.'

बातम्या आणखी आहेत...