आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राची आई अन् बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न, पकडले जाण्याच्या भीतीने दोघींना जिवंत जाळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - 5 फेब्रुवारी रोजी रात्री दर्शन अव्हेन्यूमध्ये झालेल्या आई-मुलीच्या मर्डरचा खुलासा करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सूत्रांनुसार, दोन्ही आरोपी मृत महिला गगनदीपचा मुलगा रिदमचे मित्र आहेत. ते लुटमारीच्या इराद्याने घरात घुसले होते. मुलगा रिदम 20 डिसेंबर रोजी कॅनडाला गेला होता. आरोपींनी आधी आईवर बलात्काराचा प्रयत्न केला, परंतु ती बेशुद्ध झाल्याने असे करू शकले नाहीत. यानंतर मुलीवरही रेपचा प्रयत्न केला, परंतु असे होऊ न शकल्याने तिची गळा दाबून हत्या केली. आपल्या कृत्याचा पुरावा सापडू नये म्हणून त्यांनी दोघींना जाळून टाकले.  

 

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार...
- पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, महिलेला जिवंत जाळण्यात आले होते. आरोपी घरातून फक्त 670 रुपये रोख आणि दागिनेच लुटून घेऊन गेले होते.
- दुसरीकडे पोलिस म्हणतात की, आरोपी पंकज शर्मा 21 वर्षांचा आहे, तर दुसरा आरोपी नीरज जवळजवळ 18 वर्षांचा आहे. दोघेही गुरुगोबिंदसिंग नगरचे रहिवासी आहेत.
- मुख्य आरोपी पंकजचे या कुटुंबाशी अनेक वर्षांपासून संबंध होते. चौकशीत दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. या हत्याकांडाचा मास्टरमाइंड पंकज आहे. 

 

यामुळे केली हत्या...
- मास्टरमाइंड पंकज अनेक वेळा रिदमसोबत घरी आलेला होता. त्याला वाटायचे की, गगनदीप यांच्याकडे खूप पैसा आहे, तो सहजच आपण लुटू शकू.
- गुन्हा केल्यानंतर दोघेही ओळखले गेले असते म्हणूनच आरोपींनी मायलेकीला बेशुद्ध करून त्यांचा मर्डर केला. 
- पंकजने गगनदीप वर्मा यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. परंतु त्या एवढ्या बेशुद्ध झाल्या होत्या की, त्यांना वाटले त्या वारल्याच आहेत. परंतु त्या जिवंत होत्या आणि आरोपीनेच त्यांना जिवंत जाळले. जाळताना त्या जिवंत असल्याची बाब पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून स्पष्ट झाली.

 

पावणे दोन तासांत डबल मर्डर
- आरोपींनी रात्री 8:15 वाजता डोअर बेल वाजवली. मित्राची आई गगनदीप वर्मा यांनी दार उघडले. त्या वेळी त्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या. पंकज म्हणाला... आँटी आम्ही इथून जात होतो, म्हणून भेटायला आलो. मृत गगनदीप त्यांना  ओळखत होत्या म्हणून त्यांनी आरोपींना घरात प्रवेश दिला. जेव्हा मुलगी शिवनैनीने घरातून आवाज दिला तेव्हा गगनदीप म्हणाल्या, रिदमचा मित्र पंकज आला आहे.
- रात्री 8:50 पर्यंत दोन्ही आरोपींनी कॉफी प्यायली. आरोपी खालच्या खोलीत होते (जेथे गगनदीप यांचा जळालेला सांगाडा आढळला होता.) कॉफी प्यायल्यानंतर पंकजने पाणी मागितले. गगनदीप पाणी घेऊन येताच आरोपींनी त्यांना गुंगुीच्या औषधाचा वास दिला. त्या बेशुद्ध होऊन पडल्या. पंकजने त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. परंतु गुंगीच्या औषधाचा डोस जास्त झाल्याने त्या पूर्णपणे बेशुद्ध झाल्या होत्या.
- आरोपींना वाटले की त्यांचा मृत्यू झाला आहे. मग रात्री 9:25 वाजता दोघेही घराच्या वरच्या मजल्यावर गेले, जेथे शिवनैनी काहीतरी काम करत होती. आरोपींनीही तिलाही गुंगीच्या औषधाचा वास दिला आणि बेशुद्ध केले. तथापि, शिवनैनीसोबत त्यांची बाचाबाचीही झाली. यात गुंगीच्या औषधाची बाटली फुटली आणि काचेचे तुकडे शिवनैनीच्या शरीरात शिरले.
- तिला बेशुद्ध केल्यानंतर आरोपींनी तिच्यावरही बलात्काराचा प्रयत्न केला. परंतु तिला पीरियड्स आलेले होते. यामुळे आरोपींनी तिचा गळा दाबून हत्या केली आणि आग लावून तिथून फरार झाले. 9.40 वाजता दोघांनी आईलाही जाळले.
- 9:55 पर्यंत ते घरातून निघून फरार झाले. तथापि, पळून जाण्याच्या आधी आरोपींनी घरातील कपाटे आणि लॉकरही उघडले. परंतु आरोपींना घरात फक्त 670 रुपये रोख आणि काही नकली दागिनेच हाती लागले. पोलिसांनी हा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

असे पोहोचले आरोपींपर्यंत पोलिस...
- पोलिसांना माहिती मिळाली काही काही वर्षांपूर्वी गगनदीप वर्मा ज्या परिसरात किरायाने राहत होत्या तेथे त्यांच्या मुलाचा मित्र पंकज होता. घटनेनंतर तोही गायब आहे. यावरून पोलिसांनी पंकजचे वडील पलविंदर यांच्यावर नजर ठेवली. ते सोफे बनवण्याचा व्यवसाय करतात.
- दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी ग्राहक बनून पलविंदर यांच्याशी संपर्क साधला. पलविंदर तेथे काम पाहायला आला तेव्हा पोलिसांनी त्याला घेरले. चौकशीत सांगितले की, त्यांचा मुलगा पंकज सध्या दिल्लीमध्ये मावशीच्या घरी राहतोय. त्यांनी पंकजला बहाणा करून बोलावले आणि अटक केली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या हत्याकांडाचे आणखी फोटोज

बातम्या आणखी आहेत...